मुक्तपीठ

Mother's Day : आईपणा अनुभवल्याशिवाय कळणार कसा?

सुनेत्रा विजय जोशी

आज मदर्स डे... खुप जण आईवर तिच्या महतीवर लिहीतीलच. मी मात्र उद्याच्या होऊ घातलेल्या आईसाठी..आणि माझ्या आईपणाच्या अनुभवातून लिहिते. आपल्या आईने आपल्याला जन्म देऊन आई होण्याची संधी दिली म्हणुन देखील मी आईची ऋणी आहेच. तिच्या मुळेच आज मी जी काय थोडीफार यशस्वी असेन ती आहे असे मला वाटते. 

पुर्वीच्या काळी मुलींचा जन्म व्हायचा. अगदी सात आठ मुली पण असायच्या. मुलगा होईपर्यंत. पण तरी आई कधी त्यामुलींना गौण वागणुक नाही द्यायची. मला तरी मी स्त्री म्हणुन जन्माला आल्याचे कधी वाईट वाटत नाही. प्रथम "आई" होण्याची चाहुल लागली तेव्हा मी माझे आणि माझ्या पतीच्या प्रेमाचे सुंदर प्रतिक आता सतत नजरेसमोर असणार म्हणुन हरखुन गेले. दोघांचा अंश घेऊन एक नवा जीव आपण जन्माला घालणार या विचारानेच मी खुश झाले. 

आपण शिक्षणासाठी वयाची 20 ते 25 वर्षे देतो. नंतर व्यवसाय किंवा नोकरीत स्थिरावण्यासाठी पण काही वर्षे देतो. तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, मग आईपणासाठी जर काही वर्षे द्यावी लागली तर वाईट वाटण्यासारखे काय आहे? त्यात करियर संपेल किंवा संधी हुकली असे वाटायला नको. संधी काय एकदा गेली तरी परत येत असतेच. आपणच त्या गेलेल्या संधीसाठी हळहळत बसुन येणाऱ्या संधीकडे लक्ष देत नाही.

समजा चार वर्षे जर तुम्ही दिली तरी नंतर तुम्ही पुन्हा आपले काम सुरु करु शकता की. तुमचे शिक्षण आई झाल्यामुळे काही बदलत नसते. उलट आई झाल्यावर तुम्हाला मॅनेजमेंट हा विषय पुस्तकात वाचुन कळला नसेल त्यापेक्षा बाळाच्या संगोपनाने उत्तमप्रकारे कळतो. 

अर्थात आमच्या काळी म्हणजे पंचवीस तीस वर्षांपूर्वी मुली आजच्या इतक्या करियरकडे वळणाऱ्या नव्हत्या. पण तेव्हा मुल सांभाळतांना घरातल्यांची म्हणजे सासु जाऊ वगैरेची किंवा क्वचित शेजारची मदत घ्यायला संकोच वाटत नसे. वेळ पडली की त्यांच्या मदतीला आपणही जायचे ही भावना असायची. आणि हो नोकरी व्यवसायात कितीही ताणतणाव असले तरी घरी आल्यावर बाळाच्या बाललीला बघुन त्याची चिवचिव सुखवायची आणि दिवसभराचे श्रम नाहीसे व्हायचे. म्हणुन तेव्हा योगा वगैरे मनःशांतीसाठी कधी आवश्यक वाटले नाही. शिवाय घर आणि नोकरी सांभाळुन बाळाचे संगोपन करतांना आपोआप व्यायाम होऊन वजन आटोक्यात रहायचे. सोबत आनंद मिळायचा ते वेगळेच. 

बाळाच्या बाललीलेत बाकीचे ताण कमी व्हायचे. मी कुणी अभ्यासक तज्ञ नाही पण माझे अनुभवाचे बोल आहेत. काही मिळवायचे तर काही द्यायला लागते हे तर मान्य कराल ना? 
जसा करियरचा आनंद आहे, तसा आईपणाचा पण आनंद आहेच की. पण तो अनुभवल्याशिवाय कळणार कसा? 

माझ्या आईने एक परंपरा दिली तीच मी माझ्या मुलाला म्हणजे पुढच्या पिढीला देऊ शकते. आपण मुल वाढवताना नकळत खुप काही शिकत असतो. जे जे आपल्या मुलांनी करावे, जसे वागावे असे वाटते. तसे आपणही होण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या व्यक्तिमत्व विकासासोबत आपले व्यक्तिमत्त्व पण विकसित होत असतेच. आपण क्षमाशील वृत्ती तसेच आहे तसे स्विकारणे नकळत शिकतो. सशक्त देशासाठी सुजाण नागरिक घडवण्याचे थोर काम आई करते ते कमीपणाचे कसे असेल.? 

"आईपण स्त्रीमध्ये जन्मतःच असते. तेच रुजुन पोटी जन्म घेते. सलाम तिच्या मातृत्वाचा करुनी करु आईपणा साजरा "आईबाबा दोघांचाही आयुष्यात समान दर्जा आहे. पण आई बाळाच्या संगोपनात जास्त वेळ असते आणि आपल्या शरीरात मुल वाढवते म्हणुन तिची महती जास्त गायल्या जाते. एक चांगली आई होऊन दाखवणे यापेक्षा स्वतःच्या आईला अजुन कोणता "मानाचा मुजरा" असेल असे मला तरी वाटत नाही. तेव्हा आईपणामुळे कुठलेच करियर किंवा सामाजिक कार्य थांबत नाही तर तिथुनच ते सुरु होते. 

माझ्या आईच्या स्मृतीला अभिवादन करुन माझ्यातल्या आईला देखिल वंदन. आपल्यातल्या आईपणाचा जागर सतत राहो. हीच या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT