मुंबई

मुंबईत 1,000,70 रुग्ण कोरोनामुक्त... जाणून घ्या आज दिवसभरातील नव्या रुग्णांची आकडेवारी

मिलिंद तांबे



मुंबई : मुंबईत आज 923 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 1,000,70 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.रुग्ण बरे होण्याचा दर हा 79 टक्के इतका आहे. तर मुंबईत आज  दिवसभरात 1,132 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 1,25,239 झाली आहे. आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,940 वर पोचला आहे. 

मुंबईत आज नोंद झालेल्या 50 मृत्यूंपैकी 39 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 30 पुरुष तर 20 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 50 रुग्णांपैकी तिघांंचे वय 40 वर्षा खालील होते. 30 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 17 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   
कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 923 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,00,070 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 86 दिवसांवर गेला आहे. तर 11 ऑगस्ट पर्यंत एकूण 6,22,963  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  5 ऑगस्ट  ते 11 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.81 इतका आहे. \

मुंबईत 590 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,515 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 3,746 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,955 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT