उच्च न्यायालय
उच्च न्यायालय Sakal
मुंबई

उच्च न्यायालयाच्या 38 पानी अहवालातील 12 पानं गायब?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होईलच, या आशेवर गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत; मात्र विलीनीकरणाशिवाय एसटीच्या अन्य मागण्यांबाबत न्यायालयाने निकाल जाहीर केला. विलीनीकरणाच्या अपयशानंतर आता न्यायालयाच्या ३८ पानी निकालपत्रातील १२ पाने सरकारने गायब केल्याची अफवा समाजमाध्यमावर व्हायरल झाली. विशेष म्हणजे त्या १२ पानांमध्ये विलीनीकरण आणि सातव्या वेतनाचा उल्लेख असल्याचाही दावा केला जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपपासून ते फेसबुकपर्यंत अफवांचा बाजार उठला आहे. उच्च न्यायालयाच्या ३८ पानी निकालातील १२ पाने सरकारने गायब केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातही बाहेर आलेल्या २८ पानांमध्ये न्यायाधीशांची सही नाही. गायब केलेल्या १२ पानांमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सदावर्ते बाहेर आले की १२ पाने वाचून दाखवतील, तेव्हाच आपण कामावर जायचे, अशीही पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे आधारहीन असलेल्या अफवा पसरवणाऱ्यांवर रोख लावण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.

संपकाळातील काही अफवा

- जे आंदोलक संपात सहभागी होतील, त्यांचेच विलीनीकरण होणार

- कामावर गेल्यास संपकाळातील नुकसान भरून काढणार

- आझाद मैदानात संप करणाऱ्यांवरीलच कारवाया मागे घेतल्या जातील

- सरकारने दिलेली पगारवाढ कामावर रुजू झाल्यावर मागे घेतली जाईल

- ४५ दिवसांच्या पुढे संप वाढल्यास तो अधिकृत होतो आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो

- आझाद मैदानावरील रजिस्टरमध्ये जो स्वाक्षरी करेल, त्यालाच विलीनीकरणाचे लाभ मिळतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT