12 thousand families are homeless in Palghar district
12 thousand families are homeless in Palghar district 
मुंबई

साहेब सांगाना, झेंडा कुठे लाऊ !

भगवान खैरनार

मोखाडा - देशाचे  75  वे स्वातंत्र्य वर्ष अमृत महोत्सवी वर्षं म्हणून देशात साजरे केले जात आहे. मात्र, पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागात आजही रस्ते, विज, पाणी, आरोग्य, रोजगार आणि निवारा या प्राथमिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील आदिवासी आजुनही पारतंत्र्याचे जीवन जगत आहेत. अमृत महोत्सव साजरा करताना " हर घर तिरंगा, घर घर तिरंगा " अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देत, प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात सरकारी आकडेवारी नुसार आजही सुमारे  12  हजार कुटुंब बेघर आहेत. या बेघर कुटूंबांनी " साहेब सांगाना, झेंडा कुठे लाऊ " असा सवाल ऊपस्थित केला आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये आजही रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य गावापर्यंत पोहोचलेले नाहीत. रस्ता नसल्याने अनेक भागातील रूग्णांना डोली करून पायपीट करत दवाखान्यात यावे लागते आहे. या प्रवासात शेकडो रूग्णांनी जीव गमावले आहेत. वेळेवर रूग्ण सेवा न मिळाल्याने शेकडोंचा मृत्यू झाला आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. रोजगारा अभावी प्रतिवर्षी शहराकडे स्थलांतर करावे लागते आहे. तर आजही हजारो नागरीक बेघर आहेत. एकीकडे बुलेट ट्रेन, डिजिटल इंडिया आणि एअर अॅम्बुलन्स चा डांगोरा पिटला जात आहे. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामीण भागातील नागरीक पारतंत्र्याचे जीवन जगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या निवडणुकीत सन 2022 पर्यंत एक ही कुटूंब बेघर राहणार नाही, प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्याचा पुनरूच्चार ही अनेकदा केला आहे. असे असताना आजमितीस पालघर जिल्ह्यात सुमारे 11 हजार 775 कुटुंब बेघर आहेत. त्यांना घरकुले मंजुर झालेत मात्र, बांधकाम झालेले नाहीत. पंतप्रधान आवास, शबरी आवास, रमाई आवास आणि आदिम आवास योजनेंतर्गत बेघर कुटुंबाना घरकुल योजना राबविली जाते आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचा शासनाकडून ईष्टांक दिला जातो. त्यानुसार सर्व्हेक्षण केले जाते. पालघर जिल्ह्यात या मंजूर आणि अपुर्ण घरकुलांव्यतिरीक्त आजही आदिम जमाती सह हजारो आदिवासी कुटुंब बेघर असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे प्रत्येक बेघर कुटुंबाला पक्के घर देण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे.

पंतप्रधानांनी अमृत महोत्सवी वर्षात " हर घर तिरंगा, घर घर तिरंगा " अशी हाक देत प्रत्येक घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान, स्वतंत्र भारताचा तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिरंगा झेंड्याचा अपमान होऊ नये म्हणून त्याची विशेष काळजी घेऊन, 15 ऑगस्ट ला संध्याकाळी झेंडा खाली ऊतरवुन त्याची व्यवस्थितपणे घडी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मागील वर्षात घरकुलांचा अखेरचा हफ्ता ( अनुदान ) मिळालेले नसल्याने अनेक घरकुले अपुर्णावस्थेत आहेत. अनेकांना मजुरी ही मिळाली नसल्याचे वास्तव आहे. बेघर कुटुंबाना घरेच नसल्याने, त्यांनी झेंड्याची काय काळजी घ्यायची आणि झेंडा कुठे फडकवायचा असा प्रश्न उभा ठाकला असुन " साहेब सांगाना, झेंडा कुठे लाऊ ! असा संतप्त सवाल बेघर कुटुंबानी केला आहे.

मुळातच पालघर जिल्ह्यात हजारो कुटुंब स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बेघर आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या देशाचा तिरंगा झेंडा कुठे लावायचा हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनात तिरंगा झेंड्याचा अभिमान आहे. गवताच्या झोपडीवर तिरंगा लावला तर त्याचा अपमान झाल्यास आमच्या आदिवासी बांधवांना दोषी ठरवु नका. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात प्राथमिक सुविधा आणि पक्के घरे बांधून देणे आवश्यक आहे.

- वैदेही वाढाण, जिल्हा परिषद अध्यक्षा, पालघर.

पालघर जिल्ह्यातील तालुका निहाय बेघर कुटुंबांना मंजूर आणि अपुर्ण घरकुल संख्या.......

1) पंतप्रधान आवास योजना.....

  • डहाणु - 2148

  • जव्हार - 1556

  • मोखाडा - 889

  • पालघर - 872

  • तलासरी - 848

  • वसई - 235

  • विक्रमगड - 1413

  • वाडा - 1300

  • एकुण - 9261.

2) रमाई आवास योजना.......

  • डहाणू - 9

  • जव्हार - 3

  • मोखाडा - 25

  • पालघर - 32

  • तलासरी - 8

  • वसई - 11

  • विक्रमगड - 0

  • वाडा - 21

  • एकुण - 109.

3) शबरी आवास घरकुल योजना.....

  • डहाणू - 495

  • जव्हार - 234

  • मोखाडा - 121

  • पालघर - 244

  • तलासरी - 278

  • वसई - 145

  • विक्रमगड - 225

  • वाडा - 129

  • एकुण - 1871.

4) आदिम आवास घरकुल योजना......

  • डहाणु - 79

  • जव्हार - 83

  • मोखाडा - 116

  • पालघर - 49

  • तलासरी - 35

  • वसई - 45

  • विक्रमगड - 60

  • वाडा - 67

  • एकुण - 534.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT