मुंबई

'या' पुलावरून प्रवास करत असाल तर सावधान, पालिकेनं केलं आवाहन

पूजा विचारे

मुंबईः मुंबई महापालिकेनं शहरातील रेल्वेमार्गावरुन जाणारे तब्बल १३ पूल धोकादायक म्हणून जाहीर केलेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. मुंबईमधील मध्य रेल्वेवरील चार, तर पश्चिम रेल्वेवरील नऊ उड्डाणपूल धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

तसंच यंदा गणेश आगमन-विसर्जनाला मिरवणुका काढण्यास बंदी असली तरी या पुलांवर भाविकांनी गर्दी करू नये, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. गणेश आगमन आणि विसर्जनाच्या वेळी उड्डाणपुलांवरून भाविकांची ये-जा सुरू असते. रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरूस्ती कामे सुरू झाली असून काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणारेत. मुंबईमधील नऊ उड्डाणपूल धोकादायक बनले असून काही उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. तर काही पुलांची दुरुस्ती प्रस्तावित आहे.

यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.  गणेशभक्‍तांना आणि गणेश मंडळांना रेल्‍वेमार्गावरील पुलांच्‍या संभाव्‍य धोक्‍याबाबत मुंबई महापालिकेने सावध केलं आहे. रेल्‍वेमार्गावरील पूल हे अतिशय जुने झाल्‍याने धोकादायक स्थितीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने यंदा आगमन-विसर्जनाला मिरवणुका काढण्यास बंदी घातली. तरीही या दोन्ही दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील धोकादायक १३ पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.

गणेशभक्‍तांनी पूल पार करताना काळजी घ्‍यावी. पुलावरून विसर्जनाच्‍यावेळी जाताना गटागटाने जावे. पुलांवर ध्‍वनिक्षेपकाचा वापर करू नये तसेच नाचगाणी करू नयेत. पुलांवर जास्‍त वेळ न थांबता त्‍वरित पुढे जावे. पोलिस आणि महापालिका प्रशासन यांनी दिलेल्‍या सुचनांनुसार ये-जा ठेवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे. करी रोड आणि चिंचपोकळी रेल्वेपुलांबाबत विशेषत: काळजी घ्यावी, अशी माहिती देण्यात आलीय. 

पुलांवर १६ टनपेक्षा जास्त वजन पडणार नाही. पुलावर जास्त काळ थांबून राहू नये, याची गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनादरम्यान काळजी घ्यावी, असं आवाहन देखील पालिकेनं केलं आहे. 

या पुलांवरून जाताना काळजी घ्या 

मध्य रेल्वे: घाटकोपर उड्डाणपूल, करीरोड उड्डाणपूल, चिंचपोकळी उड्डाणपूल, भायखळा उड्डाणपूल.

पश्चिम रेल्वे: मरिन लाइन्स उड्डाणपूल, सॅण्डहर्स्ट उड्डाणपूल, चर्नीरोड – ग्रॅन्टरोड दरम्यानचा फ्रेंच उड्डाणपूल, केनेड उड्डाणपूल, ग्रॅन्टरोड- मुंबई सेंट्रल दरम्यानचा फॉकलंड उड्डाणपूल, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील बेलासीस उड्डाणपूल, महालक्ष्मी स्टील उड्डाणपूल, प्रभादेवीचा कॅरोल उड्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाणपूल.

This 13 railway bridges and flayovers dangerous condition mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT