Mumbai Sakal
मुंबई

मुंबईत दहा वर्षांत १३० मराठी शाळा बंद

विद्यार्थीही एक लाखावरून ३५ हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या १३० मराठी शाळांना गेल्या दहा वर्षांत टाळे लागले आहे, तर याच काळात विद्यार्थी संख्याही एक लाखावरून ३५ हजारांवर आली आहे. दुसऱ्या बाजूला महापालिका इंग्रजी शाळांबरोबर राज्य बोर्डाव्यतिरिक्त इतर बोर्डाच्या शाळा सुरू करण्यावर भर देत आहे.

महापालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू करण्यात येत आहेत; मात्र दुसऱ्या बाजूला मराठीसह इतर भाषिक शाळांची संख्या कमी होत आहे. २०१०-११ मध्ये पालिकेच्या मराठी शाळांची संख्या ४१३ होती, तर विद्यार्थ्यांची संख्या एक लाख दोन हजारांहून अधिक होती. २०१९-२० या वर्षात शाळांची संख्या २८३ पर्यंत खाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या ३५ हजार १८१ झाली आहे. मराठी शाळांची पटसंख्या दर वर्षी घटत आहे, अशी माहिती भाजपचे आमदार अमित साटम यांनी महापालिका प्रशासनाकडून मिळवली. शिवसेनेवर निशाणा महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आल्यापासून गेल्या तीन वर्षांत मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. मराठी शाळांची संख्याही घटत आहे. अशा स्थितीत २०२७ पर्यंत मुंबईत मराठी शाळाच राहणार नाहीत, अशी परिस्थिती येऊ शकते, असा टोला आमदार अमित साटम यांनी लगावला. २०१३ नंतर आवश्यकतेनुसार शिक्षकांची भरतीही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT