मुंबई

मुंबईत गेल्या २४ तासांत 1304 नवीन कोरोना बाधितांची भर; तर 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू

मिलिंद तांबे


मुंबई : मुंबईत आज 1,304 बाधित रुग्णांची भर पडली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,22,331 झाली आहे. तर आज 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,748 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,454 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 78 टक्के इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 58 मृत्यूंपैकी 41 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 21 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 58 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 43 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.  कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1,454 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 95,354 रुग्णांना घरी सोडण्यात आले.              

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 89 दिवसांवर गेला आहे. तर 7 जुलै पर्यंत एकूूूण 5,92,230  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  1 ऑगस्ट  ते 7 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.78 इतका आहे. 

मुंबईत 582 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,396 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 3,939 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 4,196 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.
-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT