corona 
मुंबई

बापरे! मुंबईत मृतांचा आकडा 5 हजारांच्या पार; आज तब्बल 'इतक्या' कोरोना रुग्णांची नोंद.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत रुग्णासंख्या पुन्हा एकदा हजाराच्या वर गेली असून आज 1381 नवीन रुग्ण सापडले. एकूण रुग्णसंख्या 87,513 झाली आहे. तर आज 62 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 5061 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 1101 रुग्ण बरे होऊन घरी गेले.     

मुंबईत आज नोंद झालेल्या 59 मृत्यूंपैकी  जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 49 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी  5 जणांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 41 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 16 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.   
                
मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 897 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 61,011 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1101 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  59,238 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

हेही वाचा: मिरा- भाईंदर महापालिकेची व्यवस्था राम भरोसे; आयुक्तही १४ दिवसाच्या अलगीकरणात.. 
                                                                 
मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 68 टक्के इतका आहे. तर 7 जुलै पर्यंत एकूूूण 3,68,603 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.54 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 45 दिवसांवर गेला आहे.

1381 new corona patients in mumbai today 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: कर्णधारपदाची सवय झाली आहे! Shubman Gill चा विंडीजच्या खांद्यावरून ऑस्ट्रेलियावर निशाणा, म्हणाला...

Javed Akhtar : माझी मान शरमेने खाली गेलीये! तालिबानी मंत्र्यांच्या स्वागतावरून संतापले जावेद अख्तर, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ रवाना

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा! 13 वर्षीय मुलीवर भावाने केला अत्याचार, दोन मित्रांचाही सहभाग; निर्जनस्थळी नेलं अन्...

संकल्पना सोप्या करणे ‘एआय’चे काम

SCROLL FOR NEXT