15 corporates are still in NCP at Navi Mumbai
15 corporates are still in NCP at Navi Mumbai  
मुंबई

नवी मुंबईतील 15 नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार 

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादीच्या 15 निष्ठावान नगरसेवकांनी नकार दर्शवला आहे. हवे तर संपूर्ण नाईक कुटुंब भाजपमधून गेले तरी चालेल पण अखेर पर्यंत किल्ला लढवू अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी भाजपात जाण्यास विरोध केला आहे. तसेच लवकरच ते निष्ठावान नगरसेवकांना एकत्र करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. अशोक गावडे हे शरद पवारांच्या निकटवर्तीय असून पश्‍चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईत राहणाऱ्या नेत्यांपैकी एक भक्कम राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जातात. 

गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबई शहरात भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकारण तापले आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक हे सर्व राष्ट्रवादीतूम भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतू या नेत्यांच्याआधी आपणच भाजपमध्ये जाऊ अशी भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या 57 नगरसेवकांनी चक्क बैठकच घेतली होती. या बैठकीला निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक व नगरसेविकांनी हजेरी लावून भाजपमध्ये जाण्याची तयारी केली होती. मात्र अशोक गावडे, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, डॉ. जयाजी नाथ, शंकर शिंदे, नगरसेविका शुभांगी पाटील, शोभा पाटील, अशोक पाटील आदी नगरसेवकांकडून भाजप प्रवेशाबाबत नकारार्थी संकेत मिळाल्याची चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे.

मंगळवारी व्हाईट हाऊसवर संपन्न झालेल्या बैठकीतही काही नगरसेवकांनी आवर्जून कारणे देऊन अनुपस्थित राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या गैरहजेरीतून ते पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्या जो-तो भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरे काहीच बोलण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीत राहणार तरी कोण असा प्रश्‍न काही निष्ठावान कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र राष्ट्रवादीतील 15 नगरसेवकांनी आपण आहेत त्याठिकाणीच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने गणेश नाईकांनाही पुन्हा विचार करण्यास भाग पाडणारी परिस्थिती नवी मुंबईत तयार होत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कोणालाही कुठे जायचे असेल तर खुशाल जाऊ शकतात. मात्र आम्ही अखेर पर्यंत नवी मुंबईचा किल्ला लढवू. माझ्यासारखे काही निष्ठावान नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार आहेत. लवकरच मी शरद पवारांची भेट घेणार आहे. 
- अशोक गावडे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT