negative 
मुंबई

यशस्वी लढा ! 'या' जिल्ह्यातील 18 जण कोरोनामुक्त

सकाळवृत्तसेवा

अलिबाग : मुंबई, नवीमुंबईत कोरोनाचा उद्रेक होत असताना रायगड जिल्ह्यातून दिलासा देणारी बातमी आली आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 58 कोरोनाबाधितांपैकी 18 रुग्णांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. कोरोनातून बरे झालेल्या या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 38 रुग्ण असून त्यातील चार जण वगळता उर्वरित सर्वांची प्रकृती उत्तम आहे. पनवेल महापालिका वगळता उर्वरित जिल्ह्यात कोरोनाचा फारसा प्रभाव दिसून येत नसल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे. अन्य बाधित रुग्णांचाही क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत आहे, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा जिल्हा प्रशासनाला आहे. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील 14 तर रायगड ग्रामीणमधील 4 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 38 जणांवर मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील 25, पनवेल ग्रामीण 2, उरण 4, श्रीवर्धन 5, पोलादपूर 1 आणि कर्जतमधील एकाचा समावेश आहे.

बुधवारी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे येथील एका महिलेला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात इतरत्र एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यातील 14 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी

18 persons from Raigad Successful fight against Corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ketan Mhatre? मैत्री, आईचा आशीर्वाद, जिद्दीची गाथा; ४१ बाईक्स अन् ७ फोर-व्हीलर जिंकणारा सुपरस्टार... Rohit Sharma चा जबरा फॅन

Best Police Station Award : गुन्हे नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि लोकाभिमुख उपक्रमांची दखल; आंबेगावच्या पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचा जिल्हास्तरीय सन्मान

Beed News : ‘चिरीमिरी’ व मुजोरीचा मोह सुटेना; सिव्हीलच्या मावश्यांना बदली होऊनही वॉर्ड सुटेना, सीझर व एमटीपी वॉर्डमध्ये ठाण मांडून

Latest Marathi News Live Update: किडनी रॅकेटमधील दिल्लीच्या डॉक्टरचा जामीन फेटाळला; चंद्रपूर सत्र न्यायालयाचा निर्णय

Devendra Fadnavis: 'माझेही नाव पुरस्कारांच्या यादीत टाका..!' पुण्यातील बेकायदा फ्लेक्स विरोधी मोहिमेवर CM फडणवीस खूश; नेत्यांना कानपिचक्या

SCROLL FOR NEXT