मुंबई

मुंबईतील 18 उपनगरीय रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार

प्रशांत कांबळे

मुंबईः  रेल्वे स्थानकावरील अपुऱ्या सुविधा आणि रोजची गर्दी यापासून वैतागलेल्या मुंबईकरासाठी एक खुशखबर आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 19 रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा पालटणार आहे. या स्टेशनच्या विकासासाठी  रेल्वे बोर्डाने 947 कोटी रुपये मंजूर केले आहे.  मध्य रेल्वेचे 11 तर पश्चिम रेल्वेचे 8 स्टेशनचा यामध्ये समावेश आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने विकासाचा आराखडाही तयार केला आहे.

कोविडमुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे आणि छोट्या रेल्वे स्टेशनवर गर्दी नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान उभं ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील 19 उपनगरीय रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात या संबंधीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते.

19 पैकी 14 स्टेशनचा बांधकाम आराखडाही मंजूर झाल्याची माहिती आहे. यातील काही स्टेशनची रचना संपूर्ण बदलण्यात येणार आहे.या स्टेशनमध्ये प्रामुख्याने  डोबिंवली ठाणे, गोवंडी, मानखुर्द, जोगेश्वरी, मीरा भाईंदर, मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 

या स्टेशनचा कायापालट होणार

मध्य रेल्वे
भांडुप, मुलुंड, कसारा, जीटीबी  नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, नेरळ, शहाड, ठाणे, डोबिंवली

पश्चिम रेल्वे
जोगेश्वरी, मीरा भाईंदर, कांदिवली, भाईंदर, मीरा रोड, वसई , मुंबई सेंट्रल, खार

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

18 suburban railway stations Mumbai will be transformed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Latest Marathi News Live Update : हडपसर परिसरातील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदामंत्र्यांकडून अभियंत्यांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

SCROLL FOR NEXT