मुंबईत घर खरेदी करायचंय? चिंता सोडा! ही बातमी वाचा...
मुंबईत घर खरेदी करायचंय? चिंता सोडा! ही बातमी वाचा... 
मुंबई

मुंबईत घर खरेदी करायचंय? चिंता सोडा..! ही बातमी वाचा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. इमारतींचे बांधकाम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असले, तरी ग्राहकच नसल्याने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) तब्बल 26 हजार कोटी रुपये किमतीची 19 हजार 200 घरे पडून आहेत.

कोविड-19 च्या संकटामुळे बांधकाम क्षेत्र आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे बांधकाम सुरू असलेले प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होतील, याची शाश्‍वती कुणालाही देता येत नाही. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये तब्बल 78 हजार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. या घरांची किंमत सुमारे 66 हजार 950 कोटी असल्याची माहिती "ऍनारॉक' या संशोधन आणि सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. 

मुंबई महानगर प्रदेशातील 19 हजार 200 घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. पुण्यातील 15 हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झालेली नाही. दिल्ली एनसीआर क्षेत्रातील 15 हजार 600, बंगळुरूमधील 10 हजार 100 आणि हैदराबादमधील 1870 घरे विक्रीविना पडून आहेत. 

... तरीही उभारणी सुरूच 
देशातील प्रमुख सात शहरांमध्ये सहा लाख 66 हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. मुंबई महानगर क्षेत्रात तब्बल दोन लाख 13 हजार घरे आणि पुण्यात 93 हजार 300 घरे बांधली जात आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

व्हॅक्सिंगनंतर त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT