bribe crime sakal media
मुंबई

एक लाखाची लाच मागणारे दोन अभियंते 'ACB' च्या जाळ्यात, गुन्हा दाखल

अनिष पाटील

मुंबई : नळजोडणीसाठी प्लंबर 2 लाखांची लाच (2 lac bribe) मागितल्याप्रकरणी पालिकेच्या (bmc) ई वॉर्डमधील ( engineers) दोन अभियंते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सापळ्यात अडकले. यात दुय्यम अभियंता सचिन गणपत खोदडे (39) आणि विश्वभर प्रलहादराव शिंदे (28) यांच्या विरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका बांधकाम विकासकाकडील परवानाधारक प्लम्बरकड़े (plumber) अंडर लायसन्स प्लंबर म्हणून काम करतात. ते काम करत असलेल्या विकासकाला एका इमारतीत पुनर्विकासाचे काम मिळाले होते. (2 lac bribe-bmc-engineers-ACB-FIR-plumber-nss91)

नमूद इमारतीच्या नळजोडणीसाठी त्यांनी ई वॉर्डमध्ये अर्ज केला होता. याच अर्जाचा पाठपुरावा करत असताना शिंदेने त्यांच्याकडे दोन लाखांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 30 जुलै रोजी एसीबी कड़े धाव घेतली. पुढे ठरल्याप्रमाणे त्यांनी अर्जाबाबत विचारणा करताच त्यांनीही शिंदेची भेट घेण्यास सांगितले. पुढे सोमवारी एसीबीने सापळा रचत एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना शिंदेला रंगेहाथ पकड़ले. यात, खोदडेने त्याला पुढाकार दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT