मुंबई

...म्हणून मुंबईच्या रस्त्यावर उतरल्या 2 हजार टॅक्सी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सोमवारपासून लॉकडाऊन 5.0 ला सुरुवात झाली आहे. अशातच मुंबई शहर हे रेड झोनमध्ये आहे. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही सेवा थोड्याप्रमाणात शिथिल केल्यात आहेत. त्यातच मुंबईत टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी अंशतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या 2 महिने बंद असलेली टॅक्सी सेवा सुरु झाली. पण त्यात केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध आहे. प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि घर या दरम्यान प्रवास करण्यासाठीच ही टॅक्सी सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच बऱ्याचदा टॅक्सीची वाट बघत ताटकळत उभं राहावं लागत हे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून टॅक्सी बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

सोमवारपासून मुंबईत विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी टॅक्सी सेवा सुरू झाली. या सेवेसाठी मुंबईतल्या तब्बल 2000 टॅक्सी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळाली आहे. 

रेल्वे स्टेशन आणि घर असाच असेल प्रवास 

टॅक्सीच्या माध्यमातून घर ते रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानक ते घर या टप्प्यांसाठी ही टॅक्सी सेवा आहे. देशभरात सोमवारपासून काही रेल्वे धावणार आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून मुंबईत आलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी आणि ट्रेन पकडण्यासाठी घरातून स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला. अत्यावश्यक कारणांसाठी राज्य सरकारने टॅक्सीला मान्यता दिली आहे. 

500 टॅक्सीचं बुकिंग 

टॅक्सी सेवेच्यावेळी प्रवाशांच्या सुरक्षितेचं भान राखून सोशल डिस्टन्सिंग आणि निर्जंतुकीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात येतंय. तसंच लोकमान्य टिळक टर्मिनसवर दिल्लीवरून काही रेल्वेगाड्या आज सकाळपासून दाखल होत आहेत. यासाठी प्रवाशांनी 500 टॅक्सींचे बुकिंग आधीच केल्याचं समजतंय.

दरम्यान लॉकडाऊनमध्ये टॅक्सी सेवा बंद असल्याने अनेक चालकांची, त्यांच्या कुटुंबांची उपासमार झाली. त्यात आता टॅक्सी सेवा काही अंशी सुरू झाल्याने दिलासा मिळाल्याचं मुंबई मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोक्स यांनी म्हटलं आहे. 

रेल्वे स्थानकात प्रतिनिधी उपस्थित 

टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी स्थानकावरच मुंबई टॅक्सी मेन्स संघटनेचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आलेत. ज्या प्रवाशांना टॅक्सी बुकिंग करायची आहे, अशा प्रवाशांनी कॉल करुन अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करुन प्रवास करता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना स्थानकात पोहचण्यापूर्वी किंवा घरातून निघण्यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकांवरील टॅक्सी प्रतिनिधी क्रमांक

सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, दादर- चंदू नायर 9821640498

लोकमान्य टिळक टर्मिनस- फरीद 7977774884, शशी दुबे 9833080800, तुपे 9082888380

वांद्रे टर्मिनस- देवाडिगा 9029885937, कोटीयन 7977927009

मुंबई टॅक्सी संघटना प्रतिनिधी- शाम खानविलकर 8369545457, 8655551562

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

SCROLL FOR NEXT