Mumbai Sakal
मुंबई

2 लाख किंमतीचा 21 किलो गांजा जप्त : रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला यश

कोणार्क एक्सप्रेस मधून बेकायदेशीर रित्या सुमारे 2 लाख किंमतीचा 21 किलो गांजा जप्त

रवींद्र खरात

कल्याण : उडीसाहुन मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेस (Konark Express) मधून बेकायदेशीर रित्या सुमारे 2 लाख किंमतीचा 21 किलो गांजा (Ganja) जप्त करण्यात कल्याण रेल्वे (Kalyan Railway) सुरक्षा बलाच्या पथकाला यश आले असून या कामगिरी बद्दल रेल्वे प्रशासन (Railway Administration) आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाचे कौतुक केले आहे .

उडीसाहुन मुंबईकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेस मधून शुक्रवार ता 17 सप्टेंबर  रोजी  बेकायदेशीर रित्या लाखो रुपयांचा गांजा जात असल्याची खबर कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख भुपेंद्र सिंह यांनां त्यांच्या खबऱ्यानी देताच सिंह यांनी लगेच रेल्वे सुरक्षा बलाचे एक पथक नेमून कल्याण रेल्वे स्थानक मधील फलाट क्रमांक 7 वर सापळा रचण्यात आला उडीसाहुन मुंबईकडे येणारी  कोणार्क एक्सप्रेस शुक्रवार ता 17 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास येताच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने त्वरित त्या एक्सप्रेस मधील डबे  तपासणीला सुरुवात केली असता डबा क्रमांक d 2 मधील सीट क्रमांक  84 ते 89 दरम्यान तपासणी केली असता तेथे सुमारे 2 लाख 7800 रुपयांचा 21 किलो गांजा जप्त केला आहे .

हा गांजा नारकोटिक्स विभागाकडे वर्ग करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून  आणला आहे याचा तपास संबधित विभाग करत असल्याची माहिती कल्याण रेल्वे सुरक्षा बल प्रमुख भुपेंद्र सिंह यांनी माहिती दिली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

भारतीय कोचचा संघाने पटकावलं T20 World Cup 2026 स्पर्धेचं शेवटचं तिकीट! सर्व २० संघही ठरले

SCROLL FOR NEXT