मुंबई

धडकी भरवणारी बातमी; २४ तासात मुंबईत तब्बल २१८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनामुळे मुंबईकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतेय. याला कारण ठरतोय मुंबईत दररोज वाढणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाच आकडा. मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा भारतातील अनेक राज्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यापेक्षा कैक पटीने मोठा आहे.

आज (१० एप्रिल २०२०) रोजी संध्याकाळी समोर आलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. बृहन्मुंबईत गेल्या २४ तासात मुंबईत २१८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. आज दिवसभरात १० जणांनाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर आज मुंबईतून एकूण ४ रुग्णांना डिशचार्ज देण्यात आलाय. 

ग्लेल्या २४ तासात झालेल्या १० कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत मुंबईत झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या ६४ वर गेलीये तर मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा आता थेट हजाराच्या उंबरठ्यावर म्हणजेच ९९३ वर जाऊन पोहोचलाय. तर आतापर्यंत एकूण ६९ रुग्णांना डिशचार्ज मिळालाय.

महापालिकेच्या आजच्या रिपोर्टमध्ये एक धक्कादायक आकडेवारी देखील समोर येतेय. या आकडेवारीनुसार मुंबईतील एकूण रुग्णांच्या साठ टक्के रुग्णांमध्ये कोविड १९ ची कोणतीही लक्षणं पाहायला मिळत नव्हती. म्हणजेच हे सर्व रुग्ण कोरोनाचे सायलेंट कॅरिअर असल्याचं उघड झालंय. 

मुंबईतील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये किंवा कंटेनमेंट क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या जवळच्या लोकांची जी तपासणी करण्यात आली त्यातील हे सर्व नागरिक असल्याचं समोर येतंय.

218 new corona positive cases detected in mumbai mumbai corona count goes on 993 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT