कस्तुरबात लवकरच 220 अतिरिक्त बेड्‌स; पालिका करणार नवीन इमारतीची उभारणी 
मुंबई

कस्तुरबा रुग्णालयात लवकरच 220 अतिरिक्त बेड्‌स; पालिका करणार नवीन इमारतीची उभारणी

भाग्यश्री भुवड

मुंबई : पालिका कस्तुरबा रुग्णालय परिसरात नवीन इमारत बांधण्याच्या तयारीत असून, त्या ठिकाणी तब्बल 220 अतिरिक्त बेड्‌सची सुविधा देण्यात येणार आहे. इतर संसर्गजन्य रुग्णांवर उपचारांसाठी या खाटा उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी दिली. 

मध्य मुंबईत असलेल्या 125 खाटांच्या कस्तुरबा रुग्णालयात विस्तारीकरणासाठी पुरेशी जागा आहे. त्यामुळे लवकरच रुग्णालय इमारतीचा विस्तार केला जाईल. त्यात या खाटांची सुविधा दिली जाईल. कोरोनाच्या सुरुवातीपासून सर्व संशयित आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तपासणी आणि उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत होते. पालिकेच्या या रुग्णालयात कोविड चाचणीसाठीची पहिली प्रयोगशाळा होती. त्यानंतर शहरातील रूग्णांची संख्या वाढताच वरळीच्या नॅशनल स्पोर्टस क्‍लब ऑफ इंडियाच्या डोममध्ये एक जंबो सुविधा सुरू करण्यात आली. याशिवाय मरोळचे सेव्हन हिल्स रुग्णालय देशातील सर्वात मोठी कोविड सुविधा म्हणून विकसित केले गेले. त्यात जवळपास 1500 रुग्णांसाठी विशेष सुविधा करण्यात आली. 

कस्तुरबा रुग्णालय परिसरात नवीन इमारत बांधली जाणार आहे. त्या ठिकाणी 220 खाटांची अतिरिक्त सुविधा दिली जाईल. काही महिन्यांपूर्वी नव्या इमारतीसाठी प्रस्ताव केला होता. मात्र त्यानंतर जंबो कोव्हिड सुविधा सुरू केली गेली. मात्र आता नवीन इमारत उभारणीचा पुन्हा विचार केला जात आहे. इतर संसर्गजन्य आजारांसाठी या खाटा उपलब्ध करुन देण्यात येतील. 
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), मुंबई महापालिका. 

--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

SCROLL FOR NEXT