new born baby 
मुंबई

माता कोरोना पॉझिटिव्ह बाळ मात्र निगेटीव्ह; सायन रूग्णालयात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोरोना निगेटिव्ह बाळांचा जन्म.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईच्या सायन रुग्णालयात गेल्या 23 मार्चपासून आतापर्यंत 270 कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांची प्रसूती करण्यात आली. यापैकी 251 मातांची यशस्वी प्रसूती झाली असून त्यांनी एकूण 252 कोरोना निगेटीव्ह बाळांना जन्म दिला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील 11 बालके पहिल्या चाचणीला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र, काही दिवसांनंतर दुसरी चाचणी केल्यानंतर त्या देखील बालकांची चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे, आतापर्यंत जन्म घेतलेली सर्व बालके ही कोरोना निगेटीव्ह असल्याची आनंदाची बाब समोर आली आहे. 

आई कोरोना पॉझिटीव्ह असली तरी जन्माला येणारं बाळ कोरोनाबाधित नाही. सर्वसामान्यपणे ज्या गरोदर स्त्रीयांना कोरोनाने ग्रासले आहे त्यांची जन्माला येणारी बाळं मात्र कोरोनाबाधित नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून ही स्पष्ट करण्यात आले आहे. बाळाला हाताळण्याच्या पद्धतीमुळे बाळाला जन्मानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. 

23 मार्च पासून ते आतापर्यंत सायन रुग्णालयात ज्या कोरोनाबाधित गरोदर स्त्रीयांची प्रसुती झाली त्यांच्यापैकी बहुतांश नवजात बालकांना कोरोनाची लागण नव्हती. 

सायन हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित मातांच्या एकूण 252 यशस्वी प्रसुती झाल्या आहेत. यांपैकी, सर्व नवजात बालकं कोरोना निगेटिव्ह आढळली आहेत. 11 बालकं कोरोना पॉझिटिव्ह होते. मात्र ते ही काही दिवसांनी नेगेटिव्ह आल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे. सायन रुग्णालयात दरवर्षी 12 ते 15 हजार प्रसूती होतात. स्त्रीरोगतद्य विभागाचे प्रमुख डॉ. अरुण नायक यांच्या नेतृत्वाखाली या प्रसूती करण्यात आल्या. 

"21 जूनपर्यंत 270 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. या प्रसूतीपैकी 141 सिझेरियन आणि 109 नैसर्गिक रित्या प्रसूती करण्यात आली आहे. तर, एक चिमट्याने केलेली प्रसूती आहे. त्यामुळे, 251 मातांची यशस्वी प्रसूती झाली, ज्यात 252 निगेटीव्ह बाळांचा जन्म झाला आहे. यात एका जुळ्यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त 12 गर्भपात आणि 5 एकटाॅपिक म्हणजेच गर्भधारणा गर्भ पिशवीत न राहता बाजूच्या एका नळीत होते. गर्भपाताचाच हा एक प्रकार असतो. यापैकी फक्त 11 बाळ पॉझिटिव्ह आले होते. मात्र, दुसर्या चाचणीनंतर सर्व बाळांची चाचणी निगेटीव्ह आल्या. सर्व माता आणि बालकांची प्रकृती चांगली आहे. या सर्व प्रसूती आयसीएमआरच्या नियमावलीनुसारच करण्यात आल्या आहेत. पीपीई किट्स आणि सर्व सुरक्षेने या प्रसूती करण्यात आल्या आहेत". 

"या आधीही सायन रुग्णालयात 100 कोरोना निगेटीव्ह बालके जन्माला आली होती. आयसीएमआरच्या नियमावलीतही वारंवार बदल झाले आहेत. कोरोनाची लक्षणे नसली तर कोरोना चाचणी करून घ्यायची गरज नसल्याचे आयसीएमआरने सांगितले होते. त्यामुळे, मध्यंतरी अनेक गर्भवती महिलांची कोरोना चाचणी केली गेली नाही. सायन रुग्णालयात येणार्या गर्भवती महिला या धारावी, गोवंडी आणि मानखूर्द या परिसरातून येत आहेत. तर, या 251 मातांपैकी 86 माता या बाहेरच्या परिसरातील आहेत. सुरुवातीला नायर रुग्णालयात सर्व कोविड रुग्ण जात होते मात्र, आता सायन मध्ये ही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे", असंही डाॅ. नायक यांनी स्पष्ट केले आहे.

252 new born babies are corona negative in sion hospital 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Return : आयकर विभागाचा करदात्यांना इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट 5,000 दंड; ITR मध्ये चूक असेल तर आत्ताच हे करा

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Tulsi Puajn Diwas 2025: आज तुळशी पूजनाचा खास दिवस! ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Satara Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री आली अंगलट! कास पठार फिरवण्याच्या बहाण्याने बोलवलं अन् नंतर असं काही घडलं की...

Viral Memes : कोल्ड प्ले किस, महाकुंभ मोनालीसा ते इंडियन बजेटपर्यंत...2025 वर्षांत व्हायरल झाले टॉप 10 मिम्स, हसून हसून पोट दुखेल

SCROLL FOR NEXT