254 consumers inspected revealed electricity stolen crime msedcl mseb electricity theft mumbai sakal
मुंबई

Mumbai : खोणी गावात धडकला महावितरण, पोलिसांचा फौजफाटा; गावातील 250 घरांच्या मीटरची केली पाहणी

गावातील 254 ग्राहकांच्या मीटरची यावेळी तपासणी करण्यात आली असून या पाहणीत विविध पद्धतीने वीज चोरी होत असल्याचे उघड

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - खोणी गावात अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईस गेलेल्या महावितरणचे भरारी पथक आणि मानपाडा पोलिसांवर जमावाने दगडफेक करीत हल्ला चढविला होता. या हल्ल्याला न जुमानता गुरुवारी भरारी पथकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा सकाळीच गावात दाखल झाला.

गावातील 254 ग्राहकांच्या मीटरची यावेळी तपासणी करण्यात आली असून या पाहणीत विविध पद्धतीने वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. खोणी गावात यापुढेही ही मोहीम सुरु राहणार असून वीज चोरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

कल्याण ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांची महावितरणच्या भरारी पथकामार्फत तपासणी करत कारवाई करण्यात येत आहे. गावात बेकायदा वीज वापर करणाऱ्यांवर कारवाईस गेलेल्या महावितरण कर्मचारी, अभियंता यांसह भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना यापूर्वी घडल्या आहेत.

बुधवारी महावितरणचे भरारी पथक मानपाडा पोलिसांसह खोणी गावात कारवाईस गेले होते. एका बंगल्यातील वीज मीटरवर कारवाई केल्यानतंर पथक गावातून बाहेर पडत असताना, गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला. त्यानतंर लाकडी दांडक्याने पथकातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांना मारहाण करत पथकाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा तपास पोलिस करत आहेत.

जमावाच्या हल्ल्याला न जुमानता गुरुवारी सकाळी पुन्हा महावितरणचे भरारी पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा खोणी गावात दाखल झाला. महावितरणचे 100 ते 150 लोकांचे पथक आणि पोलिसांचा ताफा गावात दाखल झाला.

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, सुरेश मदने, सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे यांसह पोलिसांचे पथक गावात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात महावितरण अधिकाऱ्यांनी खोणी गावातील सुमारे 254 ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. यावेळी 55 जणांनी वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे.

यामध्ये अनेक ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. 55 जणांनी वीज चोरी केली असून 3 जणांनी अनधिकृत रित्या वीज वापरत होते, तर 19 मीटर हे संशयास्पद रित्या आढळून आले असून त्याचा पंचनामा करीत त्यानुसार वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढेही गावात ही मोहीम सुरु राहणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनधिकृत वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. कल्याण पूर्वेतील खोणी गावात वीजेची चोरी होत असल्याने भरारी पथक मानपाडा पोलिसांच्या सहकार्याने बुधवारी कारवाईस आले होते. यावेळी जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.

मात्र गुरुवारी पुन्हा पोलिसांच्या सहकार्याने 150 ते 200 लोकांचे भरारी पथक तयार करत महावितरणने कारवाई केली आहे. दिवसभरात 200 ते 250 ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. त्यामध्ये विविध प्रकारच्या चोऱ्या जसे की मीटर बायपास करुन डायरेक्ट वापरणे, मीटर स्लो करणे, मीटर काढलेला असताना वीजेचा थेट वापर असे आझळून आले. यावर कारवाई सुरु

  • ही मोहीम आणखी जोमाने करणार आहोत, दिपक पाटील, अधीक्षक अभियंता, कल्याण मंडळ कार्यालय 1

  • यापूर्वी ही घडल्यात मारहाणीच्या घटना

  • - डिसेंबर 2021 मध्ये महावितरणच्या काटेमानिवली शाखेत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ सविता काटे यांना मारहाण

  • - जानेवारी 2022 मुरबाड तालुक्यात ओजिवले गावात कारवाईस गेलेले सहाय्यक अभियंता अतुल कानोटे यांना मारहाण

  • - सप्टेंबर 2022 महावितरणच्या हाजीमलंग शाखा कार्यालयात कार्यरत तंत्रज्ञ एकनाथ तळपाडे यांना नेवाळी नाका येथे मारहाण

  • - जानेवारी 2023 काकडवाल गावात कारवाईस गेलेल्या भरारी पथकावर हल्ला

  • - जानेवारी 2023 डोंबिवलीतील आजदे परिसरात महिला विद्युत सहाय्यक विजया भूयारकर यांसह एका कर्मचाऱ्याला मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT