Kdmc 27 villages news  sakal
मुंबई

KDMC News : 27 गावातील माजी लोकप्रतिनिधींना अश्रू अनावर ; संघर्ष समितीच्या सभेत ताशेरे

शर्मिला वाळुंज

KDMC News : 27 गाव संघर्ष समितीच्या निर्णायक सभेत माजी लोकप्रतिनिधींना अश्रू अनावर झाल्याचे रविवारी पहायला मिळाले. संघर्ष समितीने निवडून दिलेले उमेदवार पालिका निवडणूकीत विजयी झाले. विजयी लोकप्रतिनिधी कायम संघर्ष समितीच्या पाठीशी उभे राहीले. गावांचा विकासकामांसाठी निधी आणणे असो किंवा गावांची स्वतंत्र नगरपरिषद मुद्दा असो हे लोकप्रतिनिधी कायम संघर्ष समितीच्या पाठीशी उभे राहीले.

मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर सभेत ताशेरे ओढल्याने लोकप्रतिनिधींना अश्रू अनावर झाले. ग्रामस्थांच्या मतावर प्रश्न उपस्थित करत लोकप्रतिनिधींनी देखील संघर्ष समिती डोंबिवलीतील ज्या लोकप्रतिनिधींच्या पाठी फिरते त्यांनी तरी मदत केली का ? असा उलट सवाल केला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका लगतची 27 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याविषयी संघर्ष समितीचा लढा सुरु आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर 2015 मध्ये ही गावे केडीएमसी मध्ये समाविष्ट करण्यात आली.

याचा फायदा भाजपने घेत ही गावे पालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचे आश्वासन देत संघर्ष समितीला भाजपच्या गोटात सामील करुन घेतले होते. त्यानंतर मात्र त्या आश्वासनांवर झुलवत ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात 27 गावांचा भार पालिकेच्या तिजोरीवर वाढला होता. विकास कामांच्या निधीवरुन 27 गावातील लोकप्रतिनिधी आणि शहरी भागातील लोकप्रतिनिधी यांच्यात वारंवार खटके उडत होते. ग्रामीण भागासाठी निधी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये लोकप्रतिनिधीं विरोधात असंतोष वाढत होता.

मालमत्ता कर वाढी संदर्भात देखील लोकप्रतिनिधी आवाज उठवित होते, परंतू त्यांचा आवाज दाबला जात होता. याचे पडसाद रविवारी पार पडलेल्या संघर्ष समितीच्या निर्णायक जाहीर सभेत उमटले. यावेळी उपस्थित काही ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले. लोकप्रतिनिधींना निवडून दिले परंतू त्यांनी काय केले गावासाठी असा सवाल उपस्थित केला. तसेच या सभेत कल्याण डोंबिवली मधील मंत्री, खासदार, आमदार यांच्या विरोधात देखील रोष व्यक्त करण्यात आला.

ग्रामस्थांचे हे बोलणे ऐकल्यानंतर माजी लोकप्रतिनिधी सुनिता पाटील यांनी ग्रामस्थांचे हे बोलणे योग्य नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले. आम्ही सातत्याने ग्रामस्थांच्या हक्कासाठी लढत होते. त्यांनी असे शब्द सभेत वापरणे योग्य नाही असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ मुकेश पाटील यांनी देखील सुनिता यांची बाजू घेत ग्रामस्थ चुकीचे बोलत आहेत असे म्हणत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय काम केली हेच सांगितले. मुकेश पाटील म्हणाले, 27 गावांच्या विकासासाठी तसेच मालमत्ता वाढीव करा संदर्भात 27 गावांच्या नगरसेवकांची एक कमिटी स्थापन केली.

करा संदर्भात अभ्यासू तज्ञांच्या सल्ल्याने पत्रव्यवहार करत पालिकेत सभात्याग केला होता. सुनिता पाटील व प्रमिला पाटील या माजी लोकप्रतिनिधींवर त्यांच्या पक्षाचा दबाव आला होता. सुनिता यांना राहूल दामले हे हात धरुन बसवित होते. महासभेत अनेक अति महत्वाचे विषय हाताळायचे आहेत, तुम्ही सभात्याग करु नका सांगत होते. त्यावेळी या दोन्ही लोकप्रतिनिधींसोबतच मोरेश्वर भोईर, जालिंदर पाटील, वझे यांनी सभात्याग केला. त्यानंतर खासदार शिंदे यांची वारंवार भेट घेत होतो. त्यावेळी त्यांच्याने नाही झाले परंतू आता त्यांनी शब्द दिला आहे. वाढीव मालमत्ता कर हा चुकीच्या पद्धतीने वाढला असून पालिका अधिकारी कुलकर्णी यांनी देखील मदत केली नाही.

असे सांगतानाच त्यांनी डोंबिवलीतील जे काही जुने जाणते नगरसेवक जे आता समितीच्या मागे मागे फिरतात त्या एकाही नगरसेवकाने त्यावेळी आम्हाला मदत केली नाही. 27 गावातून लाखो रुपये इतर नगरसेवकांनी खाल्ले. आम्ही नावाला नगरसेवक होतो. अनधिकृत बांधकाम तोडपाणी विषय असला तरी ते इतर नगरसेवकच हाताळत होते असे देखील पाटील यांनी जाहीर सभेत स्पष्टच सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT