मुंबई

ब्रिटनवरून आलेली 29 वर्षीय तरुणी पॉझिटिव्ह; नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

रविंद्र खरात

कल्याण  -  ब्रिटनवरून कल्याण डोंबिवली शहरात आलेल्या पहिल्या यादीतील 20 नागरिकांच्या आर टी पी सी आर चाचणी  करण्यात आली होती त्यातील 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 7 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून एका 29 वर्षीय तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .अन्य नागरिकांच्या आर टी पी सी आर चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे . 

ब्रिटन मध्ये आढळून आलेल्या कोरोना  विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला नविन विषाणू स्ट्रेन दिसुन आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात ब्रिटनहून कल्याण डोंबिवली  महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्व्हेक्षण करण्यात येत आहे .शासनाने पहिली यादी 55 नावांची पाठवली होती त्यात 45 जणांचे नाव आणि पत्ता शोधण्यास पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला यश आले आहे. यातील 20 नागरिकांचे आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली होती .त्यातील 8 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 7 जणांचा निगेटिव्ह रिपोर्ट आला असून डोंबिवली मधील 29 वर्षीय तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिची प्रकृती स्थिर असून तिला टाटा आंमत्रा येथे दाखल केले आहे .तर त्या तरुणीचा चाचणी अहवाल जनुकिय रचनेच्या तपासणीसाठी NIV मुंबई येथून NIV पुणे येथे पाठविण्यात आला आहे. अन्य 12 जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे .दरम्यान शासनाने पुन्हा दुसऱ्या 37 जणांची यादी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला पाठवली आहे.

शासनाकडून यादी आली असली तरी अनेक जण ब्रिटन मधून आले नसून अनेकांचे नावे दोनदा तर अनेक पालिका हद्दीच्या बाहेरील आहेत .जसे जसे पत्ता आणि नागरिक भेटतात तसे त्यांची तपासणी करत आहोत , त्यासाठी जे 25 नोव्हेंबर नंतर ब्रिटन वरून आलेत कल्याण डोंबिवली शहरात त्यांनी त्वरित पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावे ,सलग जोडून आलेल्या सुट्ट्या आणि येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, घराबाहेर फिरताना न चूकता मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे आणि काही लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन पालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे .

A 29 year old positive from Britain Caution against the background of a new virus

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Crime: बनावट क्यूआर कोड अन् फर्म...; बनावट औषधांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, 'इतका' मुद्देमाल जप्त

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Latest Marathi News Updates: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

SCROLL FOR NEXT