मुंबई

राज्य सरकारने जाहीर केली विशेष रुग्णालये! तुमच्या जवळचे रुग्णालय कोणते वाचा!

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई  : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. 2305 खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारमार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविताना आवश्‍यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष केले आहेत; मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित केली आहेत. त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही टोपे यांनी सांगितले. 

जिल्हा, अधिसूचित रुग्णालये व खाटांची संख्या 

  • ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी. बी. बिल्डिंग- 100 
  • मिरा भाईंदर- पंडित भीमसेन जोशी रुग्णालय- 100 
  • वाशी- सामान्य रुग्णालय 120 
  • कल्याण-डोंबिवली मनपा- शास्त्रीनगर दवाखाना 100 
  • रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय 100 
  • नाशिक- कुंभमेळा बिल्डिंग 100 
  • नाशिक महानगरपालिका कठडा हॉस्पिटल अनुक्रमे 70 
  • अहमदनगर- जिल्हा रुग्णालय 100 
  • नंदुरबार- डोळ्यांचा दवाखाना 50 
  • धुळे- जिल्हा रुग्णालय शहरातील इमारत 50 
  • पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध 50 
  • सातारा- सामान्य रुग्णालय 60 
  • सिंधुदुर्ग- नवीन इमारत एएमपी फंडेड 75 
  • रत्नागिरी- सामान्य रुग्णालय 100 
  • कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय 50 
  • औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय 100 
  • हिंगोली- जिल्हा रुग्णालय 100 
  • हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय 50 
  • लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय 50 
  • उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नवीन इमारत 100 
  • उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डिंग 50 
  • तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत 50 
  • नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने 50 
  • मुखेड उपजिल्हा रुग्णालय 50 
  • अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नवीन इमारत 100 
  • वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत 50 
  • बुलडाणा- स्त्री रुग्णालय नवीन इमारत 100 
  • वर्धा- सामान्य रुग्णालय 50 
  • भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नवीन इमारत 80 
  • गडचिरोली- जिल्हा रुग्णालय 100

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Pune News : दौंडमध्ये SRPF च्या ७१ व्या दीक्षांत संचलनात ३१६ नवप्रविष्ठांना कर्तव्यशपथ; आधुनिक युद्धतंत्राची तयारी सुरू!

Latest Marathi News Live Update : शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा, उच्च न्यायालयाचा आदेश

Google Search : रात्रीच्या वेळी मुली गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात? 2025 च्या धक्कादायक डेटामुळे जग हादरलं

Manchar News : मंचरमध्ये हुतात्मा बाबू गेनू प्राण ज्योतीचे जल्लोषात स्वागत; घोषणांनी दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज चौक!

SCROLL FOR NEXT