crime news. sakal
मुंबई

Mumbai Firing : मुंबईत ३१ वर्षीय महिलेचा गोळीबारात मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईतल्या मानखुर्दमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक ३१ वर्षीय महिला जखमी झाली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना फौजफाटा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

आज (शनिवारी) सायंकाळी फरजाना इरफान शेख या ३१ वर्षीय महिलेवर गोळीबार झाला. मानखुर्द परिसरात दोन कुटुंबातील महिलांमध्ये भांडण झाले होते. एका महिलेचा पती आणि मुलाने गोळीबार केला. त्यात दुसऱ्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवली असून तपासकार्य सुरु असल्याचं डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांनी सांगितलं.

महिलेच्या छातीजवळ गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून फरार आरोपीचा तपास सुरु आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये गोळीबारांच्या घटना नेहमीच घडत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन परिसरात दहशत पसरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT