38 hour mega block Panvel stations on Harbor Line for work Western Dedicated Freight Corridor mumbai sakal
मुंबई

Mega Block : ३८ तासांचा ब्लॉकमुळे हार्बवासीयांचे हाल!

बेलापूर ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद असल्याने हार्बरवासियांचे सुट्टीच्या दिवशी प्रचंड हाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकांत ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आल्याने मध्य रेल्वेने रविवारच्या नियमितपणे घेण्यात आलेला ब्लॉक रद्द केला होता. मात्र, रविवार वेळापत्रकानुसार, लोकल धावल्याने आणि बेलापूर ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद असल्याने हार्बरवासियांचे सुट्टीच्या दिवशी प्रचंड हाल झाले आहे.

तसेच रविवार वेळापत्रकामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे. पनवेल स्थानकात पश्चिम डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरने दोन नवीन (अप आणि डाऊन ) मार्ग तयार करण्यात येत आहे. या कामकरिता हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी, ३० सप्टेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून हा ब्लॉक सुरु झाला आहे.

सोमवार,२ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत हा ब्लॉकचे काम करण्यात येणार आहे. ह्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारचा नियमिपणे घेण्यात येणारा ब्लॉक रद्द केला असला तरी, रविवारचे वेळापत्रक आणि त्यातच मालगाडीचा अपघातामुळे हार्बरवासियांचे प्रचंड हाल आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून बेलापूरकडे आणि बेलापूरकडून पनवेल स्थानकात जाण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहतूकीने प्रवास करावा लागला.

याचा गैरफायदा घेत रिक्षा चालकांनी उचला असून अव्वाच्या सव्वा प्रवाशांकडून भाडे आकारले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव संपल्यानंतर कोकणासहीत पश्चिम महाराष्ट्रात गेलेले चाकरमानी मुंबईत परतू लागले आहे. मात्र, पनवेल ते कळंबोली जवळ झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे मेल- एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. तसेच ३८ तासांचा मेगाब्लॉकमुळे कोकणातून येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्यामधून प्रवाशांना पनवेल स्थानकात लोकल उपलब्ध नसल्याने रिक्षा, खाजगी ओला उबेरचा मदत घ्यावी लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba Ghat Accident : आंबा घाटात भीषण अपघात; परराज्यातील बस ७० फूट दरीत कोसळली

Marathi Breaking News LIVE: आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणाऱ्या युवकावर MPDA कारवाई

Gold Rate Today : लग्नासाठी सोनं खरेदी करताय? सोनं-चांदीच्या दरात झाले मोठे बदल...पाहा आजचे ताजे भाव

Inspirational Story: '५७ व्या वर्षी २ हजार ७०० कि.मी. सायकल प्रवास'; अनगरच्या महादेव माने गुरुजींची पंढरपूर ते घुमान २४ दिवस यात्रा..

Panchang 5 December 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT