मुंबई

ट्रेन बंद असल्याने 'मरे'ने प्रवाशांना दिला तब्बल एवढ्या कोटींचा परतावा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारीमुळे देशभरातील ट्रेनची नियमीत रेल्वे वाहतूक बंद आहे, केवळ श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु आहेत. नियमीत ट्रेन बंद केल्यामुळे तिकीट परतावा रेल्वेने सुरु केला आहे. मध्य रेल्वेने आत्तापर्यंत 387 कोटी रुपयांचा तिकीट परतावा केला आहे. 

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे रेल्वे सेवा बंद आहे. 23 मार्चपासून ही सेवा बंद आहेत. मध्य रेल्वेने आत्तापर्यंत जवळपास 54 लाख 49 हजार प्रवाशांना तिकीटांचा परतावा दिला आहे. रेल्वेच्या निर्णयानुसार 12 ऑगस्टपर्यंत ट्रेनचे बुकिंग रद्द करण्याचे ठरवले आहे, त्यामुळे या तारखेपर्यंतच्या सर्व तिकीटांचे आरक्षण रद्द करुन त्याबद्दलची रक्कम परत करण्या़चे ठरवले आहे. 

मध्य रेल्वेने मार्चमधील 8 लाख 80 हजार तिकीटे रद्द करुन 67 लाख 25 हजार रुपये रक्कम परत केली. अर्थातच सुटीचा कालावधी असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात तिकीट परतावाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढली. एप्रिलमध्ये 14 लाख 22 हजार तिकीटे रद्द करुन 94 कोटी 97 लाख रक्कम परत केली. मे महिन्यात यात वाढ झाली. त्या महिन्यात 16 कोटी 50 लाख तिकीटे रद्द केली आणि 1 अब्ज 16 कोटी 99 लाख रक्कम परत केली. जूनमध्ये 14 कोटी 97 लाख तिकीटे रद्द करुन एक अब्ज 7 कोटी 81 लाख रुपयांचा परतावा केला. 

तिकीटाची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरुच राहणार आहे. बारा ऑगस्टपर्यंत ट्रेन सुरु राहणार नसल्यामुळे हा परतावा सुरुच राहिल. त्यातच उपनगरी सेवा 101 दिवस बंद असल्यामुळेही रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT