मुंबई

वाहतूक नियम मोडणारे पोलिसच रडारवर 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांवर नेहमीच कारवाई होत असते. यात "पोलिस' लिहिलेल्या अथवा पोलिस खात्यातील दुचाकीस्वारावर कधी कारवाई झाल्याचे ऐकिवात नव्हते; मात्र ठाणे पोलिस आयुक्तांच्या निर्देशावरून शुक्रवारी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांवरच कारवाई केली आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयासमोरच किमान 40 हून अधिक पोलिसांवर ई-चलनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आल्याने पोलिस दादांच्या 'पोलिस'गिरीवर एक प्रकारे अंकुश बसवला आहे. 

ही बातमी वाचा ः ईथे मराठी माणसाला नोकरी दिली जाणार नाही
शुक्रवारी कामानिमित्त ठाणे पोलिस आयुक्तालयात कामकाजानिमित्त आलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. ठाणे नगर पोलिस ठाण्याचे पिोलस उपनिरीक्षक अशोक बाराते यांच्या पथकाद्वारे केलेल्या या कारवाईमध्ये सुमारे 40 हून अधिक पोलिस कचाट्यात सापडले. ही कारवाई करत असताना त्या पोलिसांचा वाहन परवाना; तसेच दुचाकी कोणाच्या नावावर आहे, याचीही तपासणी केली जात होती आपल्यावर कधीच कारवाई होणार नाही. अशा भ्रमात असलेल्या अनेक विनाहेल्मेट दुचाकीस्वार पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पकडण्यात आलेले अगदी गृहरक्षक दलाच्या जवान; तसेच पोलिस शिपाई आणि काही उच्चपदस्थ पोलिसही या कारवाईमध्ये सापडले. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात विनाहेल्मेट वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. आता ही कारवाई पोलिसांवरसुद्धा होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

Pune Restrictions: महत्त्वाची बातमी! पुण्यात १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; कोणत्या गोष्टींवर असणार बंदी अन् का? जाणून घ्या...

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT