recovered corona patient return home at shahapur 
मुंबई

आनंदवार्ता...ठाणे जिल्ह्यातील 42 कोरोना रुग्ण ठणठणीत होऊन स्वगृही

राहुल क्षीरसागर

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सकारात्मक बातमीही समोर आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 42 कोरोना रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले आहेत. ही सर्वांसाठी आनंददायी बाब असून कोरोना रुग्ण बरे होऊन स्वगृही परतत आहेत. त्यामुळे काळजी करू नका, काळजी घ्या असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत, त्या परिसरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोनवणे यांनी दृकश्राव्य माध्यमातून जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, सर्व तालुक्याचे संपर्क अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, आतापर्यंत ग्रामीण भागात 185 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी 42 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 74 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेले असून 824 जणांची टीम या ठिकाणी सर्वेक्षण करत आहेत. या टीमने आतापर्यंत 12 लाख 47 हजार 221 जणांचे सर्वेक्षण केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील परिसरात आरोग्य विभागाअंतर्गत शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग यांच्या मदतीने जलद सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. 

कोव्हिड केअर आणि विलगीकरण कक्षाची उभारणी 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जलद पावले उचलत असून आताच्या घडीला तीन विलगीकरण कक्ष आणि दोन कोव्हिड केअर सेंटर निर्माण करण्यात आलेले आहेत. यामध्ये टाटा आमंत्रा (भिवंडी), बीएसयूपी सोनिवली (बदलापूर), जोंधळे कॉलेज (शहापूर) याठिकाणी विलगीकरण कक्ष आहेत. तर बीएसयूपी सोनिवली, जोंधळे कॉलेज याठिकाणी कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT