मुंबई

घृणास्पद ! आपल्या मित्रांना 'त्याने' दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ही बातमी वाचाल तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विवाहित महिला किंवा मुलींची तर तळपायाची आग मस्तकाला जाईल. त्याला कारणही तसंच आहे. ही बातमी वाचून, लोकं आपला नाद पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जातायत याची तुम्हाला कल्पना येईल. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी असं देखील तुम्हाला वाटेल. मुंबईतील हा नराधम पती आपली वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या पत्नीचा वापर करायचा. आपल्या समाजात कुणीही करत नसलेल्या गोष्टी हा नराधम आपल्या पत्नीकडून करून घेत होता, एकदा नाही वारंवार करवत होता. या नराधमाला पोलिसांनी 'वाईफ स्वॅपिंग' म्हणजेच पत्नीची अदलाबदली करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

काय करायचा का नराधम : 

आपली वासना पूर्ण करण्यासाठी या माणसाने आपल्या पत्नीला मित्रांच्या हवाले केलं होतं. पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी देखील या नराधमाने आपल्या मित्रांना दिली होती. पत्नीची अदलाबदल करून शरीरसुख मिळवण्याचा नाद या नराधमाला होता. आपल्या पत्नीने देखील असं केलंच पाहिजे म्हणून तो आपल्या पत्नीला त्रास द्यायचा.  धक्कादायक बाब म्हणजे हा नवरा आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ देखील बनवत होता. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लकमेल करून मित्रांशी शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती करायचा. दरम्यान मुंबईतील नराधम ४६ वर्षीय आहे तर याच्या पतीचं वय ३९ वर्ष आहे.

सदर भीषण घटना २०१७ सालची आहे. २०१९ मध्ये म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणातील महिलेची मानसिक स्थिती ठीक नाल्याने महिलेवर अनेक आरोप लावण्यात आले. बचाव पक्षाकडून कोर्टात केस सुरु असताना महिलेच्या चारीत्र्यावर देखील शिंतोडे उडवण्यात आलेत.

मात्र कोर्टाने या पीडितेची बाजू ऐकत आता या नराधमाचा जामीन फेटाळला आहे. समजात अशी वागणूक कोणताही पती आपल्या पत्नीला देत नाही, असं सांगत कोर्टाने नराधमाचा जामीन फेटाळला आहे. यासंबंधित आणखी दोघांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय.  

46 years old man rejected bail by court he is in police custody under allegation of wife swapping 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT