मुंबई

मुंबईतील जमिनीखालचा 'महाकाय मॉन्स्टर' आला जमिनीवर, तब्बल पाच तास रस्त्यावरून प्रवास...

सुमित बागुल

मुंबई : मुंबईत वेगाने मेट्रोची कामं सुरु आहेत. अशात मुंबईत जमिनीखाली २० ते २५ मीटर खाली बोगदा (टनेल) बनवण्याचं काम सुरु आहे. हे बोगदे बनवण्याचं महाकाय मॉन्स्टर मशीन कायम जमिनीखाली असतं मात्र पहिल्यांदाच मुंबईच्या रस्त्यावरून हे अवाढव्य असं टनेल बोअरिंग मशीन (TBM) नेण्यात आलं. अगदी काही मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी या मशीनला तब्बल पाच तासांचा कालावधी लागलाय.

या मशीनची लांबी तब्बल १०० मीटर आणि वजन तब्बल ४८० टन आहे. मेट्रो तीनच्या कामाला गती देण्यासाठी मुंबईतील विविध भागांमद्ये १७ टीबीएम मशीनच्या मदतीने बोगदे बनण्याचं काम सुरु आहे. यामार्फत कुलाबा, वांद्रे आणि सिप्ज यादरम्यान ३३.५ किलोमीटरचा भूमिगत मार्ग बनवण्यात येणार आहे. एकूण अप आणि डाऊन  मार्गांवर तब्बल ५५ किलोमीटर लांब टनेल तयार करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत बोगदे बनवण्याचं ८३ टक्के काम पूर्ण झालंय.

मशीन असेम्बल करायला लागतात ४० दिवस : 

या मशीनचे शेकडो पार्ट्स आहेत. एकदा वेगळी केली की त्यांना असेम्बल म्हणजेच त्यांची व्यवस्थित जोडणी करायला करायला साधारणतः ३० ते ४० दिवस लागतात. एका बाजूने काम पूर्ण झालं की काम पूर्ण झालेल्या बाजूचे मशीनचे विविध भाग वेगवेगळे केले जातात. यामध्ये फ्रंट शिल्ड, मिडल शिल्ड, टेल शिल्ड, नट बोल्ट, कटर हेड, अशा काही भागांचा समावेश आहे. हे वेगळे केलेले भाग मशीनच्या दुसऱ्या टोकावर ठेवले जातात. मात्र या मशीनचे भाग न काढता हे संपूर्ण मशीन वरळीवरून नेहरू सायन्स सेंटरपर्यंत घेऊन जाण्यात आलं. 

अडीच किलोमीटर कापण्यास पाच तास 

१०० मीटर लांब आणि तब्बल ४८० टनांच्या या महाकाय मशीनला अडीच किलोमीटर अंतर कापायचं होतं. हे काम कोणत्याही अडथळ्याविना होण्यासाठी एक दिवस आधी एक मॉक ड्रिल देखील करण्यात आलं.यामध्ये रस्त्यात पार्क असलेल्या गाड्या हटवण्यात आल्यात. ट्राफिक पोलिसांच्या मदतीने ओव्हर हेड वायर्स आणि रस्त्यातील ट्राफिक सिग्नल देखील हटवण्यात आले.  

480 MT heavy TBM retrieved from Southend of Worli stn has been moved to ScienceMuseum

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT