मुंबई

मुंबईकरांसाठी तब्बल सात तास मॅनहोलपाशी दिला खडा पहारा, स्वतःच घर मात्र पावसात गेलं वाहून

सुमित बागुल

मुंबई : गेल्या आठवड्याच्या सुरवातीला मुंबईत धुवाधार पाऊस कोसळला. मुंबईकरांच्या काळजचा ठोका चुकवणारा असाच हा पाऊस होता. आजपर्यंत मुंबईकरांनी जे पाहिलं नाही ते या पावसाने दाखवलं. नवीन रेकॉर्ड देखील प्रस्थापित केले. जिथे कधीही पाणी साठत नाही अशा ठिकाणीही पाणी साठलेलं यंदाच पाहायला मिळालं. या धुवाधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आता एका महिलेचं सर्वत्र कौतुक होतंय. कारण या महिलेने स्वतःचा जीव धोक्यात घालत, कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत मुंबईकरांसाठी एक धैर्याची कामगिरी बजावलीय.
 
कोण आहेत 'या' महिला आणि त्यांनी केलंय काय ?

कांता मारुती कलन असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने मुंबईकरांच्या जीवासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावलीये. मुंबईत विशेषतः पावसाळ्यात मॅनहोलमध्ये पडून अनेकांनी आपले प्राण गमावलेत. हाच प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या ५० वर्षीय महिलेने धुवाधार पावसात एक मॅनहोल उघडून तब्बल सात तास त्या उघड्या मॅनहोलपाशी खडा पहारा दिला. 

दिवस होता सोमवार ३ ऑगस्टचा. सोमवारी पावसाला सुरवात झालेली. दिवसभर पाऊस पडला होता. या पावसामुळे मुंबईतील तुलसी पाईप रोडवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साठलं होतं. माटुंगा स्टेशनजवळील झोपडीत कांता नामक ५० वर्षीय महिला राहतात. पावसाने साठलेल्या पाण्यात त्यांनी ती रात्र तशीच घालवली. यानंतर दुसऱ्या दिवशीही तशीच परिस्थिती होती.

मंगळवारी सोमवारपेक्षा अधिक पाऊस झाला आणि या भागातील पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं. अशात महापालिकेकडून पाण्याचा निचरा कारण्यासाठी या भागातल्या मॅनहोलचं झाकण उघडण्यात आलं नव्हतं. पाण्याचा अजिबात निचरा होत नाही पाहून कांता यांनी सकाळी सहा वाजता कपड्याची दोरी करून रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण उघडले. मात्र त्यामध्ये मोठ्या वेगाने पाणी जात असल्याचं पाहताच संभाव्य धोका देखील त्यांनी ओळखला. या मॅनहोलमध्ये पडून कुणीही जीवानिशी जाऊ नये म्हणून त्यांनी त्या मॅनहोलपाही तब्बल सात तास खडा पहारा दिला. 

मोठी बातमी - तब्बल एक हजार कोटींचा अवैध माल; नाव्हा शेव्हाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, कसं डोकं वापरलेलं वाचा

तब्बल सात तास त्याठिकाणी उभं राहूनही काहीही फायदा झाला नाही. जेव्हा त्या घरी गेल्यात तेंव्हा त्यांचा सगळं संसार वाहून गेला होता. मुलीच्या ऑनलाईन क्लाससाठी जमवलेले दहा हजार रुपये देखील वाहून गेल्याचं त्या म्हणालात. कुणीही मॅनहोल उघडायला येत नसल्याने मीच ते उघडल्याचं त्या म्हणालात. दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्याला दरडावले असं देखील त्या म्हणालात. 

50 years old women stood at manhole to alert citizens of mumbai but her own home washed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT