मुंबई

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठीही आता 'एक्सप्रेसवे'ला चालना?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाची योजना तयार करण्यात आली. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोकणात जाण्यासाठी 500 किलोमीटर लांबीचा हरीत कोकण एक्सप्रेस वे तयार करण्याची योजनेस वेग देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कोकणातील या द्रूतगती महामार्गासाठी सल्लागार नेमण्याची सूचना केली आहे. त्यांना यासंदर्भातील अहवाल करण्यास सांगितले आहे. मार्चमध्ये राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सागरी किनाऱ्या जवळून हा हरित एक्सप्रेसवे बांधणार असल्याचे जाहीर केले होते. तो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाईल असे सांगितले होते. 
संकल्पीत एक्सप्रेसवे रायगडमधील चिर्ले येथून सुरु करण्याचा विचार आहे. याच ठिकाणी बावीस किलोमीटर लांबीचा मुंबई ट्रान्स हार्बर पूल रायगडला जोडला जाणार आहे. हा द्रूतगती महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यतील पत्रादेवीपर्यंत असेल. हे महाराष्ट्र गोवा सीमेवरील गाव आहे. या द्रूतगती महामार्गाने कोकणातील पर्यटनास चालना मिळेल तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ताण कमी होईल. 

या द्रूतगती महामार्गासाठी नियुक्त होणारे सल्लागार हा प्रकल्प किती फायदेशीर ठरेल याचबरोबर त्याचा सामाजिक परिणाम काय होईल आणि पर्यावरणावर किती परीणाम होईल याचाही विचार करेल. त्याचबरोबर राज्य सरकारला उत्पन्न मिळण्यासाठी कोणत्या पद्धत उपयुक्त ठरेल, याचीही सूचना करणार आहे. 

राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरु केले आहे. त्यास 55 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई नागपूर प्रवास आठ तासात होईल. महामंडळाने यापूर्वीच वर्सोवा - वांद्रे सागरी महामार्गाचे काम सुरु केले आहे. त्याचा खर्च सात हजार कोटी आहे. हा मार्ग विरारपर्यत वाढवण्यात येईल. त्यासाठी 24 हजार कोटी खर्च होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT