मुंबई : मुंबई बनावट पावत्यांच्या सहाय्याने व्यवहार दाखवून 520 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) अपहार केल्याप्रकरणी एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. जीएसटी विभागाच्या मुंबई कक्षाने अटक केली. आरोपी संचलाकाची राजकीय पार्श्वभूमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी : पालिकेने केलं शुल्क माफ, मात्र पार्किंग ठेकेदारांकडून वाहन चालकांची पाकीटमारी सुरूच
सुनील हायटेक इंजिनिअरींग कंपनीचे संचालक सुनील रत्नाकर गुट्टेला अटक करण्यात आली आहे. बनावट पावत्याांच्या सहाय्याने तीन हजार कोटी रुपयांचा व्यवहार दाखवला. त्याच्या सहाय्याने 520 कोटी रुपयांचा कर परतावा घेण्यात आल्याचा आरोप आहे. या फसवणुकीतून फायदा घेणाऱ्यांची यादी मोठी असून त्याचा तपास नवी दिल्ली, हैद्राबाद, लुधियाना, गुरुग्राम, मेरठ, अहमदाबाद, कोलकाता आदी विविध ठिकाणांपर्यंत पोहोचला आहे.
महत्त्वाची बातमी : मुंबई विमानतळावर क्रिकेटर कृणाल पांड्याला DRI ने घेतलं ताब्यात, चौकशी सुरु!
पण आरोपीची कंपनी या व्यवहारातील मुख्य ऑपरेटर असल्याचे जीएसटी विभागाकडून सांगण्यात आले. याशिवाय आणखी एका कारवाईत श्री ओशिया फेरो अलॉय प्रा, लि. चे विजेंद्र रंका यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी 1371 कोटी रुपयांचे नावट व्यवहार दाखवून 209 कोटी रुपयांच्या जीएसटीचा परतावा घेतल्याचा आरोप आहे.
( संपादन - सुमित बागुल )
520 crore GST embezzlement case accused with political background arrested
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.