6-month-old child rescued safely within12 hours of kidnapping in Kalyan West two arrested Marathi crime News 
मुंबई

Mumbai Crime News : आईच्या कुशीतून सहा महिन्यांच्या चिमुरड्याचं अपहरण; पोलिसांकडून १२ तासात मुलाची सुखरूप सुटका

Mumbai Crime News : दिनेश भैय्यालाल सरोज (वय 35) व अंकीतकुमार राजेंद्रकुमार प्रजापती ( वय 25) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : भंगार गोळा करणारी महिला तिच्या 6 महिन्याच्या चिमुकल्यासह फुटपाथवर झोपली होती. याचा फायदा घेत शनिवारी रात्री तिच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 12 तासाच्या आत मुलाचा शोध घेऊन उल्हासनगर येथून त्याची सुटका केली. चिमुकला अरबाज त्याच्या आईच्या कुशीत सुखरूप पोहोचला आहे. उल्हासनगर येथील रिक्षाचालकाने या चिमुकल्याचे अपहरण का केले याचा पोलीस तपास करत आहेत.

दिनेश भैय्यालाल सरोज (वय 35) व अंकीतकुमार राजेंद्रकुमार प्रजापती ( वय 25) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दिनेश हा रिक्षाचालक असून अंकित हा टेलरचे काम करतो. फिर्यादी महिला आयेशा शेख (वय 20) या कल्याण पश्चिमेला व्हॉल मेमोरीयल मेवेडीस्ट चर्च पेथील केडीएमसी बस स्टॉप शेजारी फुटपाथवर राहतात. भंगार गोळा करण्याचे काम त्या करतात. शनिवारी रात्री 1 ते 4 या दरम्यान आयेशा या आपल्या मुलांसह झोपल्या असता त्यांच्या मुलाचे अपहरण झाले होते. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 तपास पथके तयार केले होते. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व मिळालेल्या खात्रीशीर माहितीचे आधारे सापळा रचून दिनेश व अंकीतकुमार यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याचवेळी 6 महिन्याचा अपहृत मुलगा अरबाज समीर शेख याची उल्हासनगर येथून आरोपीच्या राहत्या घरातून सुखरूप सुटका केली.

रविवारी दोघांना पोलिसांनी अटक केली असून तपासात दिनेश हा रिक्षा चालवित असताना मुलाचे पालक गाढ झोपेत असल्याची खात्री करून त्या मुलास गुपचुप उचलून नेऊन अंकित च्या मदतीने त्याच्या राहते घरी ठेवले असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे तपास सुरू आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक विजय नाईक हे करीत आहेत. 6 महिन्याचा अरबाज याची 12 तासात सुखरूप सुटका करत त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हासाठी वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT