मुंबई

मुंबईत कोरोना संसर्गामुळे 606 जण नवे बाधित; रुग्ण बरे होण्याचा दर 92 टक्के

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज 606 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 2,90,629 झाली आहे. तर आज 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,981 वर पोचला आहे. आज 402 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,66,162 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 318 दिवसांवर गेला आहे. तर 12 डिसेंबर पर्यंत एकूण 20,91,138 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.22 इतका आहे. 

मुंबईत आज नोंद झालेल्या 12 मृत्यूंपैकी 9 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 7  पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. मृत झालेल्यांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते. 2 जणांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 9 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 

मुंबईत 439 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 4,924 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 3,266 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 461 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

606 new cases of corona infection in Mumbai The patient recovery rate is 92 percent 

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT