मुंबई

कल्याण डोंबिवलीत तब्बल 62 क्षेत्र प्रतिबंधित; जाणून घ्या तुमच्या परिसरातील क्षेत्र

शर्मिला वाळुंज


ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रातील लॉकडाऊनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी नियंत्रणात येत असली तरी कल्याण डोंबिवलीतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत मात्र वाढ झाली असल्याचे चित्र गेल्या दोन आठवड्यात दिसून येत आहे. 19 जुलैला पालिका हद्दीत 48 प्रतिबंधीत क्षेत्रांची नोंद झाली होती. दहा दिवसांत यांत वाढ झाली असून सध्या पालिका हद्दीत 62 प्रतिबंधित क्षेत्रांची नोंद झाली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रांवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले असून मिशन ब्रेक द चेन या भागात सुरु आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दिवसाला सरासरी 300 च्या आसपास कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 10 प्रभागांतील 62 परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिका प्रशासनाने जाहीर केले आहेत. त्यात अ प्रभागक्षेत्रातील मांडा, टिटवाळा, मोहने यांसह 10 परिसर प्रतिबंधित आहेत. त्याखालोखाल डोंबिवली पश्चिम परिसर ह प्रभाग क्षेत्र व त्यानंतर क प्रभागक्षेत्र कल्याण पश्चिम परिसरात जास्त प्रतिबंधित क्षेत्राची नोंद आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी धारावी पॅटर्न, मिशन ब्रेक द चेन, जंतुनाशक फवारणी, धूर फवारणी, प्रभागांत मोफत चाचण्या, सर्वे केला जात आहे. यामुळे गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. 16 जुलैच्या आसपास पालिका हद्दीत दिवसाला सरासरी 600 च्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत होती. यावर नियंत्रण मिळविण्यात पालिका प्रशासनाला काहीसे यश आले असून हे प्रमाण आता दिवसाला सरासरी 300 च्या आसपास आले आहे.

रुग्ण दुपट्टीचा वेगही मंदावला
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग 16 जुलैला साधारण 12 दिवसांचा होता. पालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग कमी करण्यात पालिका प्रशासनाला यश येत आहे. 1 ऑगस्ट रोजी रुग्ण दुप्पट वाढीचा वेग 42 दिवसांवर आला असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बाधितांची संख्या 19 हजार 967 आहे. यामध्ये एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 13 हजार 840 असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 770 आहे. तर मृतांची संख्या 357 झाली आहे. 

- महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट क्षेत्र

अ प्रभागक्षेत्र - 10 
- वडवली / अटाळी
- आंबिवली गावठाण 
- मांडा (पश्चिम)
- मांडा (पूर्व)
- टिटवाळा गणेश मंदिर
- बल्याणी 
- गाळेगाव
- मोहने गावठान
- मोहने कोळीवाडा
- शहाड 

ब प्रभागक्षेत्र - 7 
- गांधारे
- बारावे, गोदरेज हिल
- मिलिंदनगर, घोलपनगर
- बिर्ला कॉलेज
- वायलेनगर
- रामदासवाडी
- रामबाग खडक

क प्रभागक्षेत्र - 8  
- आधारवाडी
- फडके मैदान 
- बेतुरकरपाडा
- ठाणकरपाडा
- अहिल्याबाई चौक
- सिद्धेश्वर आळी
- गोविंदवाडी
- बैलबाजार

जे प्रभागक्षेत्र - 3
- कोळसेवाडी 
- लोकग्राम 
- जरीमरी नगर 

ड प्रभागक्षेत्र - 6 
- संतोषनगर, तिसगांव
- विजयनगर
- आमराई
- हनुमाननगर - दुर्गानगर
- भगवाननगर
- खडेगोळवली

फ प्रभागक्षेत्र - 6 
- कांचनगांव, खंबाळपाडा
- स्वातंत्र्यवीर सावरकर रोड 
- सारस्वत कॉलनी
- पेंडसेनगर
- पाथर्ली गावठाण
- गोग्रासवाडी 

ह प्रभागक्षेत्र - 9 
- राजुनगर
- गरिबाचा वाडा
- महाराष्ट्र नगर
- गावदेवी मंदिर, नवागाव
- गणेश मंदिर एलोरा सोसायटी
- कोपर रोड 
- जुनी डोंबिवली 
- कोपरगाव

ग प्रभागक्षेत्र - 4
- रघुवीरनगर, संगितावाडी
- दत्तनगर
- तुकारामनगर
- एकतानगर

आय प्रभागक्षेत्र - 3
- चिंचपाडा, नांदिवली तर्फे अंबरनाथ
- पिसवली 
- भाल, दावडी, उंबोर्ली 

ई प्रभागक्षेत्र - 6 
- आजदे
- डोंबिवली एमआयडीसी
- सोनारपाडा, गोळवली
- सागांव, सोनारपाडा
- भोपर संदप
- माणगांव, सोनारपाडा

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरली विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करताना पोलिस प्रशासनाकडून मारहाण

१८७ पदांसाठी ८ हजार उमेदवार, थेट विमानतळाच्या धावपट्टीवर घेतली परीक्षा; पाहा Drone VIDEO

Pirangut Accident : पिरंगुट घाटात भीषण अपघात; तिघेजण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT