मुंबई

सलाम ! वय ६२ वर्ष, तरीही रोज उन्हात पनवेल ते वडाळा प्रवास करून करतायत रुग्णसेवा

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले. त्यामुळे रुग्णांची फरफट होत आहे; मात्र काही डॉक्टरांनी रुग्णांची निकड लक्षात घेऊन आपले दवाखाने सुरू ठेवले आहेत. डॉ. अरुण मोहिते त्यांच्यापैकी एक डॉक्टर. दररोज पनवेल ते वडाळा असा प्रवास करून रुग्णांना ते मोफत सेवा देत आहेत.

कोरोनाच्या भीतीमुळे तसेच अपुऱ्या सुरक्षा साधनांअभावी गल्लोगल्लीतील दवाखाने बंद झाले. त्यामुळे साध्या तापाच्या रुग्णांनाही उपचार मिळणे कठिण होत आहे. त्यामुळे  62 वर्षीय डॉक्टर अरुण मोहिते यांनी आपल्या वयाचा विचार न करता आपला दवाखाना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मोहिते हे पनवेल जवळील कामोठे या याठिकाणी राहतात; मात्र त्यांचा दवाखाना वडाळ्यात आहे.  दररोज कामोठे ते वडाळा असा 35 किलोमीटरचा प्रवास करत त्यांची वैद्यकीय सेवा सुरू आहे. ते दररोज किमान 22 ते 25 रुग्णांना तपासतात. कामोठे ते वडाळा हे अंतर रोज ते बसने पुर्ण करतात.  

सध्या कोरोनामुळे सर्वच घाबरले आहेत. संस्थेने सांगितल्यामुळे माझाही दवाखाना काही काळ बंद होता; मात्र या सेवा बंद करून कसे चालेल. क्लिनिक बंद होते तेव्हाही मी माझ्या रुग्णाच्या संपर्कात होतो. फोनवरूनच त्यांना आजारावर सल्ले देत होतो. 

इतरांनीही दवाखाने सुरू करावेत

डॉ. अरुण मोहिते यांनी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मास्क घालून येणे अनिवार्य  केले आहे. सर्दी, ताप , खोकला असल्याची तक्रार घेऊन अनेक रुग्ण येतात. या सर्वांच्या मनात कोरोनाची भीती असते. अशा रुग्णांची भीती घालवण्यासाठी डॉक्टरची गरज असल्याने मी दररोज क्लिनिकला येतो व पुढेही येत राहणार, असे डाॅ. मोहिते यांनी सांगितले. इतर डाॅक्टरांनीही आपापल्या परिसरात दवाखाने सुरू करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

62 years old doctor traveling from panvel to wadala for his patients during corona crisis

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

Mumbai Local Violence: मुंबई लोकलमध्ये १२ तासांत चार हिंसक घटना; प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

ममतांना आणखी एक धक्का, ३ महिन्यापूर्वी राज्यसभेवर पाठवलेल्या खासदार कोयल यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT