मुंबई

देशातील श्रीमंत महापालिकेचे बजेटही कोलमडणार! वाचा काय आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः बृहन्मुंबई महापालिकेने कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आत्तापर्यंत 630 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले आहेत. आता ही साथ अद्यापही पूर्णपणे आटोक्यात न आल्यामुळे खर्च वाढणारच आहे. या परिस्थितीत सध्याच्या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकात बदल करणे भाग पडेल अशीच चिन्हे दिसत आहेत. 

बृहन्मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. कोरोनाच्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी होत असलेला खर्च आत्तापर्यंत आकस्मिक निधीतून होत आहे. हा निधी एकंदर 850 कोटी रुपयांचा आहे. आता यातील 220 कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या दोन महिन्यात कोरोना रोखण्यासाठीच्या खर्चात वाढ झाली आहे. एप्रिलपर्यंत महापालिकेचे शंभर कोटी खर्च झाले होते. मात्र त्यानंतर त्यात वाढ झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खर्च 480 कोटींपर्यंत गेला, तर जूलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तोच 630 कोटींपर्यंत वाढला.  

रुग्णांसाठीच्या सुविधा तयार करण्यासाठीच जास्त रक्कम खर्च झाली आहे. अर्थात त्याचबरोबर कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसेच नर्सची निवासव्यवस्था, नव्याने करारबद्ध केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन, भोजन, पीपीई किटस्, एन 95 मास्क, थ्री प्लाय मास्क, ग्लोव्हज््, फेस शिल्ड, हायड्रोक्लोरोक्वीन, थर्मोमीटर्स, बॉडी बॅग्ज, प्रोटेक्टिव आय वेअर, सॅनिटायझर्स यावरही खर्च झाला. अर्थात काही कंपन्यांनी सीएसआर योजनेअंतर्गत साह्य केले, तसेच काही समाजसेवी संस्थांनीही या वस्तूंची मदत केली. मात्र ही मदत नेमकी किती आहे हे समजू शकले नाही. 

आता कोरोनाची साथ पूर्ण आटोक्यात न आल्यास महापालिकेच्या अंदाजपत्रकात केलेल्या तरतूदीत बदल करणे भाग पडेल असे महापालिकेतील वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात नेमका कसा निधी उपलब्ध करता येईल याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र याबाबतचा निर्णय सोपा नसेल. त्यास विरोध होऊ शकेल. महापालिकेने अद्याप खर्च कसा झाला हे सांगितलेले नाही असे काहींचे मत आहे. 
महापालिकेचे अंदाजपत्रक फेब्रूवारीत माडण्यात आले, त्यावेळी कस्तुरबा रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधांसाठी तरतूद करण्यात आली, तर आरोग्य विभागासाठी 4 हजार 260 कोटी तरतूद करण्याचे ठरले होते. रस्ता, पूल उभारणी यासाठी अनेक योजना तयार करताना राखीव निधीचाही वापर करण्याचे ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT