slum 
मुंबई

 बापरे! मुंबईतील झोपड्या-चाळींमध्ये आहेत तब्बल 'इतके' कोरोना रुग्ण; आकडा बघून तुम्हालाही बसेल धक्का... 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील 40 टक्के नागरीक हे प्रतिबंधित क्षेत्रात राहात आहे.तर कोविड बाधित रुग्णांपैकी 65 टक्के रुग्ण हे झोपड्या आणि चाळींमध्ये आढळले आहेत.मुंबईतील झोपड्या चाळीमधील 789 ठिकाणं प्रतिबंधीत करण्यात आली आहेत. तर 4 हजार 538 इमारती सिल करण्यात आली आहेत अशी माहिती पालिकेने आज जाहीर केली.

इमारतींमधील 9 हजार 956 कोविड बाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.तर झोपड्या आणि चाळीचा प्रतिबंधीत क्षेत्रातील 18 हजार 957 रुग्ण उपचार घेत आहेत.असे 28 हजार 913 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. महापालिकेच्या 2015 च्या अंदाजा नुसार 1 कोटी 26 लाख 43 हजार 252 मुंबईची लोकसंख्या आहे.तर कोविड मुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या दाट वस्स्त्या आणि सिल केलेल्या इमारतींमध्ये 50 लाख 21 हजार 548 नागरीक राहात आहेत.त्यातही 42 लाख 18 हजारहून अधिक नागरीक झोपडपट्ट्या आणि चाळीतील आहेत.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्र,सिल इमारती रहिवाशांपैकी  14 टक्के रहिवाशी पी उत्तर  म्हणजे मालाड  मधिल आहेत.यात प्रतिबंधित झोपड्या आणि चाळीत 7 लाख 11 हजारहून अधिक रहिवाशी आहेत.तर, इमारतींमधिल 9 हजार 70 नागरीक आहेत. 12 टक्के नागरीक हे के पुर्व म्हणजे अंधेरी,जोगेश्वरी पुर्व भागातील आहेत.या भागातील 6 लाख 42 हजार 995 नागरीक कोरोना रुग्ण आढळलेल्या परीसरात राहात आहेत.यात झोपडपट्ट्या आणि चाळीतील 4 लाख 53 हजार रहिवाशी आहेत तर इमारतींमधिल 1 लाख 89 हजार नागरीकांचा समावेश आहे. या प्रभागात सध्या 1977 रुग्ण उपचार घेत आहेत.

सिल केलेल्या झोपड्या आणि चाळींमधील लोकसंख्या :

पी उत्तर  मालाड -- 7 ,11,484 

के पुर्व अंधेरी जोगेश्वरी पुर्व -- 4 ,35,742

एच पुर्व वांद्रे, सांताक्रुझ पुर्व -- 3,56,200

आर दक्षिण कांदिवली -- 3,36,200

एफ नॉर्थ दादर,माटूंगा पुर्व शिव -- 3,00,115 

ईमारतींमधील लोकसंख्या: 

के पुर्व अंधेरी पुर्व -- 89,253 

पी दक्षिण कांदिवली -- 1,66,597 

जी उत्तर दादर,माहिम,धारावी -- 58,831 

एम पश्चिम चेंबूर -- 54,667 

एम पुर्व गोवंडी मानखुर्द -- 50, 667 

65 percent of corona patients lives in slum in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime: भोंदू खरातच्या ऑफिसबॉयला अटक, कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज लीक करत फोडलेलं बिंग

अवकाळी पाऊस नैसर्गिकच, केमिकल ट्रायलचा दावा निराधार; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

रुपया सार्वकालिक नीचांकी, डॉलरच्या तुलनेत ६४ पैशांनी कोसळून ९३.५३ वर

Chhatrapati Sambhajinagar News: भोकरदनमध्ये दुर्दैवी घटना; खदानीत बुडून माय-लेकीचा मृत्यू, परिसरात शोककळा

Income Tax: १९६१ चा प्राप्तिकर कायदा इतिहासजमा; नव्या करप्रणालीचा ‘प्रारंभ’ देशभर सुरू

SCROLL FOR NEXT