पालघर मदत
पालघर मदत 
मुंबई

पालघरमधील अतिवृष्टीग्रस्तांना 7 कोटींची मदत

प्रकाश पाटील

पालघर : जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे पालघर जिल्ह्यातील बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 62 हजार 798 शेतकऱ्यांचे 25 हजार 580.66 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून सात कोटी 54 लाख 43 हजार रुपयांचे अनुदान महसूल व वन विभागाकडून प्राप्त झाले आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले आहे. 

कमला मिल अग्नितांडव प्रकरणः गिरणी मालक सत्र न्यायालयाकडून दोषमुक्त जाहीर
आपद्‌ग्रस्तांना शेतपिकांसाठी व आश्‍वासित सिंचनाखालील पिके यापूर्वीच्या सरकारच्या निर्णयानुसार सहा हजार 800 रुपये प्रतिहेक्‍टरी इतकी तरतूद होती. त्यामध्ये तीन हजार 200 प्रतिहेक्‍टरी वाढ करून एकूण 10 हजार प्रतिहेक्‍टरी मदत देण्यात येणार आहे. तसेच बहुवार्षिक पिकांसाठी यापूर्वीच्या प्रतिहेक्‍टरी 25 हजार प्रतिहेक्‍टरी मदत मिळणार आहे.


अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकारकडून सात कोटी 54 लाख 43 हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. 
- डॉ. माणिक गुरसाळ, जिल्हाधिकारी, पालघर 

 

 

7 crore assistance to flood victims in Palghar
( संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT