मुंबई

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ७०% कोरोना रुग्णांबद्दल दिली 'ही'अत्यंत महत्त्वाची माहिती

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वच राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतलाय. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

महाराष्ट्रात लॉकडाऊन हा १४ एप्रिल नंतर आणखी पंधरा दिवस म्हणजे किमान ३० एप्रिल पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलीये. याचसोबत उद्धव ठाकरे यांनी मुंबईबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. एकट्या मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्यावर गेलाय. मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा हा देशातील काही राज्यांच्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत  समोर आलीये. अशात मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा चिंता वाढवणारा आहे. मात्र यापैकी सत्तर टक्के रुग्णांमध्ये सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणं आहेत असं सांगितलंय.      

काय म्हणालेत मुख्यमंत्री 

महाराष्ट्रात आणि त्यातही मुख्यत्वे मुंबईत वाढती कोरोना रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय आहे. मुंबईत अनेकांचे अहवाल निगेटिव्ह येण्याचं प्रमाण देखील वाढलंय. मुंबईत हजाराच्यावर कोरोना रुग्ण आहेत. अशात या हजारावरील पासष्ठ ते सत्तर टक्के रुग्णांमध्ये अतिसौम्य किंवा सौम्य लक्षणं आढळून आले आहेत. याचसोबत महाराष्ट्र आणि मुंबईत केल्या गेलेल्या कोविड चाचण्यांची देखील आकडेवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सादर केली. महाराष्ट्र कोरोना चाचण्यांमध्ये सर्वाधिक चाचण्या करणारं राज्य आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३३ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. याचसोबत एकट्या मुंबईत तब्ब्ल १९ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.  

70 percent of corona positive cases have very light symptoms says maharashtra cm uddhav thackeray   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT