मुंबई : दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ होत आहे. मुंबईत आतापर्यंत बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या 700 च्या वर गेल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रोज दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे; मात्र रोज100 ते 125 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरीदेखील जात असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. शुक्रवारी (ता. 24) 120 रुग्ण बरे होऊन घरी गेले; तर आतापर्यंत 700 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एकाच कुटुंबातील कोरोनाचे ६ रुग्णही बरे झाले आहेत.
जोगेश्वरी परिसरातील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातून सर्वाधिक म्हणजे 39 रुग्ण बरे झाले आहेत. त्याखालोखाल घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातून 27 रुग्ण; तर कुर्ला परिसरातील खान बहादुर भाभा रुग्णालयातून 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पालिकेची तीन प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये यांच्यासह महापालिकेच्याच उपनगरीय रुग्णालयांमध्येदेखील कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
700 corona patients cured in Mumbai Information of the health department of the municipality
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.