मुंबई

डिपार्टमेंटमध्ये फोफावतोय कोरोना; राज्यात एकूण 714 पोलिस कोरोना बाधीत

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कुरोनाविरुद्ध लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला आहे. राज्यात आता एकूण 714 पोलिस कोरोनााधीत आहेत. एकट्या मुंबईत 309 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलिस कर्मचा-यांचा  मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. याशिवाय 81 पोलिस अधिका-यांही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत पाच पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 61कोरोना बाधीत पोलिस उपचार घेऊन घरी परतले असून सध्या 648 पोलिसांवर कोरोनावर उपचार घेत आहेत.

मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचा-यांसह पोलिस अहोरात्र मेहनत घेत रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाने पोलिसांनाही विळखा घातला आहे. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन पोलिस आयुक्तलयात सुरू करण्यात आली आहे. त्यावर बहुतांश पोलिस व कुटुंबियांनी रुग्णालयात भरती करण्यात येणा-या अडचणीबाबत तक्रार केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलिसासाठी सांताक्रुझ वाकोला पोलीस वसाहतीतील एक इमारत कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

या ठिकाणी जवळपास 300 बेडची व्यवस्था केली गेली आहे. याशिवाय पोलिस ठाण्याच्या पातळीवर मुंबईबाहेर राहणा-या पोलिसांची राहण्याची सुविधा करण्याबाबतही प्रक्रिया सुरू असून पोलिस ठाण्यात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच मरोळ येथेही अशाच पद्धतीने एका इमारतीचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. तसे झाल्यात तेथेही 250 बेड्स कोरोनाबाधीत पोलिसांसाठी उपलब्ध होतील.

714 police officers and worker detected positive in maharashtra read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

भन्नाट योजना! बारावी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना ११ महिने नोकरीपूर्व प्रशिक्षण; दरमहा मिळतील ६,००० ते १०,००० रुपये

आजचे राशिभविष्य - १८ मे २०२६

प्रोटीन, फायबर आणि चवीचा जबरदस्त कॉम्बो! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा दुधी-चणा डाळ पराठा

SCROLL FOR NEXT