covid e-pass google
मुंबई

मुंबईतून तब्बल ७३ टक्के ई-पास अर्जांना परवानगी नाकारली कारण....

परवानगी नाकारण्यामागे ही आहेत प्रमुख कारणे

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रातंर्गत प्रवास करता यावा, यासाठी ६.८ लाखापेक्षा जास्त नागरिकांनी ई-पास मिळवण्यासाठी पोलिसांकडे ऑनलाइन अर्ज केले. पण प्रत्यक्षात ५४ टक्के नागरिकांना ई-पास नाकारण्यात (e-pass denied permission) आला. मुंबईत ई-पासना परवानगी नाकारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मुंबईत ७३ टक्के ई-पास (Mumbai E-pass) अर्जांना पोलिसांनी परवानगी नाकारली. ई-पासना नकार देण्यामागे दोन मुख्य कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. (73 per cent Mumbai applicants being denied permission for e-pass)

अर्जदारांकडे इमर्जन्सीमध्ये प्रवास करण्याचे सबळ कारण नव्हते तसेच अतिआवश्यक कारणांसाठी आपण प्रवास करतोय, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली नाहीत. ई-पासना परवानगी नाकारण्यामागे ही दोन प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी प्रमाणे राज्य पोलिसांनी २२ एप्रिलपासून ई-पास सुरु केलाय. अत्यावश्यक सेवेचा भाग नसलेल्या पण अन्य राज्यातून महाराष्ट्रात यायचे असल्यास किंवा महाराष्ट्रातंर्गत प्रवासासाठी ई-पास बंधनकारक आहे.

अत्यावश्यक सेवेत असलेल्यांनाही कामासाठी प्रवास करायचा असल्यास ई-पास आवश्यक आहे. शहरातंर्गत इमर्जन्सी कारणासाठी कोणी प्रवास करत असेल, तर ई-पासची आवश्यकता नाही. ज्या ७३ टक्के मुंबईकरांना ई-पास नाकारला, त्यांनी व्यावसायिक बैठक, अन्य राज्यातून घरी परतायचेय, धार्मिक कार्यक्रम अशी कारणे दिली होती. मुंबई पोलिसांचे पीआरओ चैतन्य एस यांनी ही माहिती दिली. मुंबईत ४४,१५८ अर्ज प्राप्त झाले. त्यातल्या ३२ हजार ३२४ अर्जांना परवानगी नाकारण्यात आली. ११,३०० जणांना ई-पास मंजूर करण्यात आला. गुरुवारपर्यंत राज्यभरातून ६ लाख ८२हजार ३६० अर्ज प्राप्त झाले. त्यातले १२,७८६ अर्ज प्रलंबित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT