मुंबई

राज्यातील कोरोनाचे थैमान थांबेना! वाचा आजच्या रुग्णसंख्येची आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : राज्यात कोरोनाच्या 790  नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या 12,296 वर पोहोचली आहे. आणखी 36 जणांचा कोरोनाने बळी घेतला; आतापर्यंत एका दिवसात झालेल्या मृत्यूंचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 521 झाला आहे. राज्यात आणखी 121 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एकूण 2000 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात कोव्हिड-19 विषाणूबाधेचे आणखी 790 रुग्ण सापडल्याने संसर्ग वेगाने पसरत असल्याचे दिसते. त्यापैकी सर्वाधिक 547 रुग्ण मुंबईत आढळले. दिवसभरात राज्यात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 27, पुणे शहरात तीन, अमरावती शहरात दोन; तसेच वसई-विरार, अमरावती जिल्हा आणि औरंगाबाद शहरात प्रत्येकी एका रुग्णाचे निधन झाले. त्याशिवाय पश्चिम बंगालमधील एका रुग्णाचा मुंबईत मृत्यू झाला. 

मृतांमध्ये 28 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. या 36 जणांपैकी 19 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील आणि 16  रुग्ण 40 ते 59 वर्षे वयोगटातील व एक जण 40 वर्षांखालील होता. मृतांमधील तिघांच्या इतर आजारांबाबतची माहिती मिळाली नाही. उर्वरित 33 रुग्णांपैकी 23 जणांना (70 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यातील मृत्यूंची संख्या आता 521 झाली आहे. 

दृष्टिक्षेपात...
थ्रोट स्वॅब तपासणी : 1,61,092 
निगेटिव्ह : 1,48,248 
पॉझिटिव्ह : 12,296
क्लस्टर कंटेनमेंट झोन : 844 
सर्वेक्षण पथके : 10,513 
लोकसंख्येची पाहणी : 44.40 लाख
बरे झालेले रुग्ण : 2,000 
होम क्वारंटाईन : 1,74,933
संस्थात्मक क्वारंटाईन : 12,623

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT