police esakal
मुंबई

Mumbai Crime: ते पत्र बनावट? आठही महिला पोलीसांनी बलात्काराची तक्रार न केल्याची दिली स्पष्टोक्ती

Mumbai lady Police Serious Allegation on Police Officer : हे पत्र माध्यमांमध्ये आल्यानंतर ते बनावट-फेक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे, याची चर्चा मुंबई पोलीस दलात सुरु आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई पोलीस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आल्याचे पत्र चर्चेचा विषय ठरलं होतं. पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून मुंबई पोलीस दलातील आठ महिलांवर बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या आठ महिला याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता याबाबत मोठी माहिती समोर आहे.

आठही महिला पोलीस शिपायांनी त्यांच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे तसेच अशी कोणतीही तक्रार न केल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. आपल्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोपही महिला पोलीस शिपायांनी केला आहे. मोटर परिवहन विभागातील पोलीस उपायुक्त तसेच दोन पोलीस निरीक्षकांनी आणि त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांनी बलात्कार तसेच गर्भपात करवल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती. महिला पोलीस शिपायांच्या नावाचा गैरवापर करून बनावट पत्र नेमकं कोणी पाठवलं आणि त्या मागच्या उद्देशाची चौकशी सूरू करण्यात आली आहे.

व्हायरल पत्रात नेमकं काय?

मुंबईतील मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अत्याचार झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली. मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातील पीडित महिला आणि आरोपी अधिकारी असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून वारंवार बलात्कार झाल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीनं गर्भपात करण्यास देखील भाग पाडण्यात आल्याचा दावा खळबळजनक आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

ते पत्र बनावट असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही, जी घटना माध्यमांमध्ये आली आहे, ती चुकीची आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT