मुंबई

Breaking! 80 वर्षीय कोरोना रुग्ण शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता; रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्ण पळून गेल्याची घटना घडली आहे. या रुग्णाचा मृतदेह बोरिवली स्थानकाबाहेर सापडला असल्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा आणि उपचारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. 

मुंबई पालिकेच्या रुग्णालयांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय आजोबांचा बोरिवली स्टेशनला मृतदेह सापडला. 

आजोबांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 
पालिका रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वा-यावर असुन  काल पहाटेपासून 80 वर्षीय आजोबा बेपत्ता होते. कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने शताब्दी रुग्णालयात ते उपचार घेत होते. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईंकांनी केला आहे.

महापौर देणार रुग्णालयाला भेट - 
शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोनाग्रस्त वृध्द पळून गेल्याच्या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले हे रुग्णालयाला भेट देणार आहेत. तिथली परिस्थिती पाहून काय कारवाई करायची यावर निर्णय घेण्यात येईल असे अमेय घोले यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळचा अध्यक्ष कोण होणार? आज निवड, कोल्हापुरात वातावरण तापलं; ६०० पोलिसांचा बंदोबस्त

Kolhapur News: डॉ. हेंद्रे, आडनाईक; के. डी. पाटील ‘गोकुळ’वर ; ‘शासन नियुक्त’ची यादी जाहीर; सांगलीचे ॲड. पाटोळेही

Maharashtra Weather Forecast : राज्यात गुलाबी थंडीचे आगमन, दिवाळीनंतर जोर वाढणार; जाणून घ्या तुमच्या भागात आज कसे असेल हवामान?

Flower Market: पाडव्याच्या मुहूर्तावर फुलांना मोठी मागणी;झेंडूची २१ हजार किलोंहून अधिक आवक; चांगल्या प्रतीच्या फुलांना भाव

IND vs NZ 3rd ODI Live : रोहित शर्मा, विराट कोहली वैतागले; सर्व खेळाडू बसमध्येच बसून राहिले, हॅमिल्टनमध्ये नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT