मुंबई

८१ वर्षांचे आजोबा, ७० वर्षांच्या आजी; सायन रुग्णालयात कोरोनावर झाला उपचार आणि...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाबाधित 70 वर्षीय महिलेने आणि तिच्या 81 वर्षीय पतीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सायन रुग्णालयात तात्काळ आणि योग्य पद्धतीने मिळालेल्या उपचारांमुळे हे शक्य झाल्याचे जोडप्याचे म्हणणे आहे. 

काही दिवसांपूर्वी हे कोरोनाबाधीत जोडपं सायन रुग्णालयात दाखल झाले होते. त्या दोघांचीही ही प्रकृती चिंताजनक होती. सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर, त्यांची प्रकृती आणखी बिघडली. 4 ते 5 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या व्हेंटिलेटरच्या साहाय्याने तिच्या प्रकृतीत हळूहळू सूधारणा होत गेली. त्यानंतर, त्या महिलेला 4 ते 5 दिवस हाय फ्लु नेसल ओक्सीजनवर ठेवण्यात आले होते. हे सर्व उपचार केल्यानंतर त्या वृध्द महिलेच्या प्रकृतीत बरीचशी सुधारणा होत गेली. 

त्या महिलेला संपूर्ण आठवड्यासाठी श्वास न घेता मास्कसह उच्च प्रवाहाच्या ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक होता आणि जास्त प्रमाणात अँटीबायोटिक्स (पाइपरासिलिन , टॅझोबॅक्टॅम), अझिथ्रोमाइसिन, एचसीक्यू आणि डोस स्टिरॉइड्सवर ठेवण्यात आले होते. औषधांचा प्रभाव आणि उपचारांना प्रतिसाद हिच आशा होती. पण त्या महिलेने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. आता ही महिला कोणत्याही ओक्सीजन सपोर्ट शिवाय बोलू शकते. फिरू शकते. 

वॉर्डमधील डॉक्टरांनी या दोघांवर ही सर्वतोपरी उपचार करुन त्यांचा जीव वाचवला आहे. डॉक्टरांनी केलेलया या कार्यासाठी या जोडप्याने डॉक्टरांचे आभार मानले. आणि हसत हसत रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. डॉक्टरांना ही या महिलेवर झालेल्या यशस्वी उपचारांवर समाधान व्यक्त केले असल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. 

81 one year old man and 70 years old woman fought against covid19 and won the fight 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT