Mumbai Sakal
मुंबई

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८८ शाळा सुरु

जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या मिळून ८८ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील कोरोनामुक्त (Corona) गावांत स्थानिक प्रशासन आणि पालकांच्या संमतीने शाळा (School) सुरू करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मिळून ८८ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. सध्या ३९२ गावे करोनामुक्त आहेत. या गावातील स्थानिक प्रशासन तसेच पालकांच्या संमतीने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात खासगी आणि जिल्हा परिषद अशा सर्व व्यवस्थापनाच्या आठवी ते बारावी वर्गाच्या एकूण ३८५ शाळा आहेत. त्यातील ८८ शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ जुलैपासून १४ शाळा सुरू करण्यात आल्या होत्या; तर दुसऱ्या टप्प्यात २२ शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. यात खासगी शाळांचे प्रमाण सर्वाधिक आहे; तर शहापूर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजेच ५३ शाळांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. राज्य शासनानेही अशा गावांमध्ये गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. त्यात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे असून जिल्ह्यात शिक्षकांच्या लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर शिक्षकांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.

जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांची संख्या अधिक आहे. त्यानुसार, प्रत्येक गावातील सरपंच समिती आणि पालकांची संमती घेऊन टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत असल्याची माहिती जि. प. शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT