कोरोना  sakal
मुंबई

मुंबईत 24 तासात 889 कोरोना बाधितांची नोंद; निर्बंध लागणार?

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के इतके झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील कमी झालेली कोरोना बाधितांची (Maharashtra Corona Update) आकडेवारी पुन्हा एकदा वाढतानाचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 889 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे राज्यातील आकडेवारीदेखील वाढत असून, गेल्या 24 तासात राज्यात 1,357 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील 889 कोरोना बाधित एकट्या मुंबईतील असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, मुंबईतील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे. (Mumbai Corona Update)

शुक्रवारी राज्यात 1,034 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. तर तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आज हा आकडा थेट 1,357 वर नोंदवण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के इतके झाले आहे. मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात सध्या 5, 888 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4, 294 इतके सक्रिय रुग्ण नोंदवण्यात आले आहे. त्या खालेखाल ठाण्यात 769 इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मास्क वापरण्याचं आवाहन, सक्ती नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

राज्यात काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती करण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होत. पण कोणत्याही प्रकारे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (appeal to use masks in the Maharashtra its not compulsory Health Minister Rajesh Tope explanation)

टोपे म्हणाले, आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्या संख्येमुळं केंद्रीय आरोग्य विभागानं आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील.

"निर्बंध नको असतील तर मास्क वापरा"; मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकं वर काढले असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना पुन्हा निर्बंध नको असतील तर, स्वतःहून शिस्त पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनी नागरिकांना केले आहे. वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी काल कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT