मेट्रो आणि इतर विकासकामांसाठी मुंबईतील रिक्षा स्टॅण्डचे ९० टक्के थांबे हटवण्यात आले आहेत.  esakal
मुंबई

Mumbai Rickshaw : मुंबईत रिक्षा स्टॅण्ड शोधू कुठे?

Mumbai Auto Problem : ९० टक्के थांबे बंद; रिक्षा संघटना न्यायालयात दाद मागणार

सकाळ डिजिटल टीम

नितीन जगताप

Mumbai : सकाळी स्टेशनला पोहोचण्यासाठी आणि संध्याकाळी स्टेशनहून घरी जाण्यासाठी रिक्षा न मिळणे किंवा रिक्षावाल्यांनी भाडे नाकारणे ही रोजचीच कटकट झाली आहे. या विवंचनेतून प्रवाशांची सुटका व्हावी, म्हणून शहरात कित्येक ठिकाणी रिक्षा उभी करण्यासाठी किंवा शेअर रिक्षा सेवेसाठी रिक्षा स्टॅण्ड सुरू केले होते.

मेट्रो आणि इतर विकासकामांसाठी मुंबईतील रिक्षा स्टॅण्डचे ९० टक्के थांबे गायब झाले आहेत. त्यामुळे रिक्षा स्टॅण्ड शोधू कुठे, अशी वेळ प्रवासी आणि रिक्षाचालकांवर आली आहे. दुसरीकडे याविरोधात रिक्षा संघटनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन म्हणाले की, मुंबई उपनगरातील रिक्षा स्टॅण्डच्या यादीप्रमाणे स्टॅण्डची संख्या मर्यादित असून नवीन रिक्षा स्टॅण्ड, तसेच ज्या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड आहेत, मात्र त्या जागीचे खांब रस्ते बांधकामात काढले गेले आहेत.

त्यामुळे असे ९० टक्के (खांब) थांबे पुन्हा सुरू करण्यात आलेले नाहीत. यासाठी रिक्षा थांबा असलेले खांब त्या ठिकाणी लावणे आवश्यक आहे. स्टॅण्डची संख्या मर्यादित आहे. त्यात रस्त्यावरून किंवा चौकातून एखा‌दे प्रवासीभाडे घेतल्यास वाहतूक पोलिस त्यावेळेस फोटो काढतात आणि दंड आकारतात.

यात प्रथम गुन्ह्यास रुपये ५०० आणि त्यानंतर १,५०० पर्यंत ई-चलन आकारले जात आहे. तसेच पश्चिम उपनगरात १८२ तर पूर्व विभागात १३६ असे एकूण ३१८ रिक्षा स्टॅण्ड आहेत. मात्र, त्यापैकी अनेकांचे बोर्ड कोठे दिसत नाहीत, जे बसविणे अत्यंत गरजेचे आहे.

मुंबईत रेल्वे स्टेशनापासून ठराविक ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा स्टॅण्ड सुरू करण्यात आले. रस्त्यावर ठराविक ठिकाणी रिक्षा स्टॅण्डचे बोर्ड उभारण्यात आले होते; पण आता स्टॅण्ड दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो.

- प्रतीक भुरे, प्रवासी

रिक्षा परवाना २०१७ मध्ये खुला केला तेव्हा १.४० लाखावरून २.६० लाखांपर्यंत रिक्षांची संख्या पोहोचली आहे. सध्या ८३१ स्टॅण्ड असून त्यामध्ये एकूण २,७८६ रिक्षा उभ्या राहू शकतात. ही संख्या एकूण रिक्षांच्या तुलनेत केवळ एक टक्का इतकीच आहे. त्यामुळे एमएमआरटीएने समिती नेमून लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार आहोत.

- थंपी कुरियन, सरचिटणीस,

मुंबई रिक्षा मेन्स युनियन

विकासकामांसाठी रिक्षा स्टॅण्डचे खांब परत बसविले जात नाहीत. रिक्षा कुठे उभी केली तर पोलिस कारवाई करतात. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- के. के. तिवारी, अध्यक्ष,

भाजप रिक्षा टॅक्सी सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT